क्रीडाताज्या घडमोडी

“तो चांगला खेळतोय का नाही, हे तुम्ही ठरवायची गरज नाही” केएल राहुलच्या सध्याच्या फोर्मवर गौतम गंभीरने केले मोठे वक्तव्य..

“तो चांगला खेळतोय का नाही, हे तुम्ही ठरवायची गरज नाही” केएल राहुलच्या सध्याच्या फोर्मवर गौतम गंभीरने केले मोठे वक्तव्य..


सध्या भारतीय संघाचा स्टार सलामीवीर खेळाडू केएल राहुल त्याच्या सर्वांत वाईट फोर्ममधून जात आहे. जवळपास गेल्या वर्षभरापासून राहुलने टीम इंडियासाठी एकसुद्धा चांगली खेळी खेळलेली नाहीये. कसोटी असो अथवा एकदिवशीय सामना की टी-20 सर्वच फोर्मेटमध्ये राहुल धावा काढण्यास असमर्थ ठरत आहे.

अश्यात आता लोकांनी त्याला चांगलेच ट्रोल करून संघातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. राहुलचा मागील काही दिवसातील फोर्म पाहता टीम इंडियातील माजी दिग्गज खेळाडूसुद्धा त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहेत. एकीकडे सर्वच स्तरातून राहुलला टीम इंडियातून बाहेर काढण्याची मागणी होत असतांना दुसरीकडे मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू ‘गौतम गंभीर; हा लोकेश राहुलच्या समर्थनात उतरला आहे.

भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने केएल राहुलचे समर्थन केले आहे. गौतम गंभीर म्हणाला की, केएल राहुलला टीम इंडियातून वगळू नये. कोणत्याही खेळाडूला  असे वाईट काळात एकटे सोडू नये. प्रत्येकजण वाईट फॉर्ममधून जातो. तो चांगला चालला आहे की नाही हे कोणीही त्याला सांगू नये. प्रतिभावान खेळाडूंना पाठीशी घालावे.

राहुल बद्दल गौतम गंभीरने असे वक्तव्य करताच गंभीर सुद्धा सोशल मिडीयावर तुफान ट्रोल व्हायला लागलाय. एकंदरीत काय तर आता तिसऱ्या कसोटीसाठी केएल राहुलला जवळपास संघातून बाहेर करावे, असे मत लोकांचे झाले आहे. आणि टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी राहुलला उपकर्णधारपदावरून काढून टाकत त्याला तिसऱ्या कसोटीतून वगळण्याचे संकेतसुद्धा दिले आहेत.

त्यामुळे आता ऑस्ट्रोलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुल संघाबाहेर बसण्याचे चिन्ह जास्त दिसत आहेत. असं असलं तरीही आयत्या वेळेला कर्णधार रोहित शर्मा राहुलला पुन्हा एक संधी देण्याचे धाडस दाखवू शकतो कारण टीम इंडिया अगोदरच या सिरीजमध्ये वरचढ ठरली आहे.

हेही वाचा:

सतत फ्लॉप होऊनही के.एल. राहुलला संघात जागा देऊन बीसीसीआय ‘या’ 3 खेळाडूंचे करिअर करतेय बर्बाद, एकजण तर आहे ताबडतोब फोर्ममध्ये..!

दुसऱ्या कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर ऑस्ट्रोलीया संघाला आणखी एक मोठा धक्का, ‘या कारणामुळे कर्णधार पॅट कमिन्स परतला मायदेशी..!

‘या’ गोलंदाजाची धुलाई करत चेतेश्वर पुजाराने बनवलाय वर्ल्ड रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरलाय पहिला फलंदाज


व्हिडीओ प्लेलीस्ट:

https://youtu.be/treU6AddvMI

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button