- Advertisement -

WTC Final 2023: WTC फायनलमध्ये श्रेयस अय्यरची जागा घेणार हा खतरनाक फलंदाज! बीसीसीआयने केले शिक्कामोर्तब

0 1

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरची जागा कोणता फलंदाज घेऊ शकतो, हे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे.

यावर्षी ७ जून ते ११ जून या कालावधीत भारताला ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना खेळायचा आहे. श्रेयस अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया होणार आहे, त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाहीये.

श्रेयस अय्यर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल न खेळल्यास हनुमा विहारीचा विचार केला जाऊ शकतो, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. अलीकडेच बीसीसीआयने हनुमा विहारीला वार्षिक करार यादीतून वगळले आहे. आता श्रेयस अय्यर दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे, त्या परिस्थितीत बीसीसीआयला हनुमा विहारीची आठवण आली आहे. सूर्यकुमार यादवचा कसोटी रेकॉर्ड चांगला नसल्यामुळे आता बीसीसीआय हनुमा विहारीचा विचार करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.