Viral Video: हार्दिक पंड्या ने टाकला एवढा जबरदस्त चेंडू की,मिचेल मार्शचा मधला स्टंप उडून पडला बाहेर, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल..
Viral Video: हार्दिक पंड्या ने टाकला एवढा जबरदस्त चेंडू की,मिचेल मार्शचा मधला स्टंप उडून पडला बाहेर, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात हार्दिक पांड्या किफायतशीर गोलंदाजी करतांना दिसत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या तीन खेळाडूंना बाद करून कांगारू संघाला 3 मोठे धक्के दिले आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर सलग तीन धक्के बसल्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे.
हार्दिक पांड्याने पहिल्यांदा ट्रॅव्हिस हेडला बाद केले. मग स्टीव्ह स्मिथला चालायला लावले आणि शेवटी चांगली फलंदाजी करणारा मिचेल मार्शही क्लीन बोल्ड झाला. बाद झाल्यानंतर मिचेल मार्शला धक्का बसला. त्याने 47 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 47 धावा केल्या.

पंड्याने मार्शला असा बाद केला,पहा व्हीडीओ..
वास्तविक, हार्दिक पांड्याने भारतासाठी 15 वे षटक टकले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने मिचेल मार्शला बाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू मार्शने टोलावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागून थेट स्टंपमध्ये गेला. आणि अशा प्रकरे मार्श क्लीन बोल्ड झाला. हार्दिक पंड्याचा हा व्हीडीओ मात्र सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. 17 षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 94 धावा केल्या आहेत. सध्या डेव्हिड वॉर्नर 7 धावांवर तर मार्नस लबुशेन 4 धावांवर नाबाद आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका आतापर्यंत १-१ अशी बरोबरीत आहे. आज तिसरा आणि निर्णायक सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जो जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय स्वरूपाचा इतिहास (IND vs AUS ODI मध्ये हेड टू हेड)
भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 145 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 54 सामने जिंकले आहेत, तर कांगारू संघाने 81 वेळा विजय मिळवला आहे, तर 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. या दोन्ही संघांनी भारतीय भूमीवर आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत, त्यापैकी 30 भारताने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने 31 सामने जिंकले आहेत. 5 सामने अनिर्णित राहिले.
3rd wicket by Hardik Pandya 🏏
Aus 89-3 #CricketTwitter #Ausvsind #INDvsAUS3rdodi pic.twitter.com/RJ3CNxnXgU— Tushar Gurjar (@Tushaargurjar) March 22, 2023
असे आहेत दोन्ही संघ:
ऑस्ट्रेलिय प्लेइंग इलेव्हन – डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (डब्ल्यू), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
भारत प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (क), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (w), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…