क्रीडा

viral video: मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर ने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की विरोधी संघाचा कर्णधारसुद्धा झाला हैराण, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल..

viral video: मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर ने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की विरोधी संघाचा कर्णधारसुद्धा झाला हैराण, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल..


मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार फलंदाजी केली. हरमनने आपल्या डावात अनेक शानदार शॉट्स खेळले, ज्यामुळे मुंबईला चांगली धावसंख्या गाठता आली.

मुंबई इंडियन्सच्या डावाच्या अखेरीस हरमनने गुजरातच्या गोलंदाजांसमोर चांगलेच हात खोलले. . तिने शानदार फलंदाजी करत लोकाचे मनोरंजन केले.  हरमनने 18 व्या षटकात गुजरातची गोलंदाज सदरलँडला लक्ष्य केले, तिने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मागे जाऊन जागा बनवली आणि एक शानदार पुल शॉट खेळला, जिथे चेंडू गोळीच्या वेगाने सीमापार गेला. तिचा हा शॉट पाहून मैदानात उपस्थित प्रेक्षक जोरदार जल्लोष करू लागले. तिचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

हरमनने  51 धावांची शानदार खेळी खेळली

हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने 7 शानदार चौकार आणि 2 जबरदस्त षटकार मारले. त्याची फलंदाजी पाहून प्रेक्षक चांगलेच खूश झाले. हरमनच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने 162 धावा केल्या, ज्या गाठण्यात गुजरातचा संघ अपयशी ठरला.

महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरचा शानदार खेळ सुरूच आहे. तिने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या खेळी केल्या आहेत. ज्यामध्ये 65 धावा ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. हरमन प्रत्येक सामन्यात धावा करत आहे.

5 विजयासह मुंबई इंडियन्स प्लेओफ मध्ये जाणारा पहिला संघ ठरला.

डब्ल्यूपीएल 2023 मध्ये एकही सामना न गमावता मुंबई इंडियन्सने सलग 5 विजय नोंदवत प्लेऑफ मधील आपले स्थान पक्के केले आहे. यंदाच्या हंगामात प्लेओफमध्ये जाणारी मुंबई ही पहिलीच टिम ठरली आहे. मुंबईने जवळपास सर्वच विरोधी संघांना एकदा टीआर गुजरात जोइंट्सला दोन वेळा पराभूत केले आहे.

हरमणप्रीत कौर

व्हीडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



हे ही वाचा..

“ये तो सस्ता हरभजन सिंह निकला” शुभमन गिल च्या गुगलीवर स्टेडियम मधील लोकांनी केला एकच कल्ला.   शुभमनची बॉलिंग पाहून विराट-रोहितला हसू आवरता आले नाही, VIDEO झाला व्हायरल

रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार

चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…

Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button