ICC T20 Ranking 2023:आयसीसीने जाहीर केली नवीन आकडेवारी… नव्या वर्षात सुद्धा सूर्याच एक नंबर, तर हार्दिक पंड्या, ईशान किशनची मोठी झेप.. पोहचले या अंकावर.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला ताज्या ICC T20 क्रमवारीत फायदा झाला आहे. इशान किशनने 10 स्थानांनी झेप घेत 23 व्या स्थानावर पोहोचले आहे, तर श्रीलंकेविरुद्धच्या वर्षातील पहिल्याच सामन्यात 23 चेंडूत 41 धावा करणारा दीपक हुडा देखील अव्वल 100 मध्ये सामील झाला आहे.
हुड्डा यांनी 40 स्थानांची झेप घेत 97 वे स्थान पटकावले आहे. इशानने पहिल्या T20 सामन्यात 37 धावांची इनिंग खेळली होती. गेल्या वर्षी नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात अपयशी ठरला होता, तरीही तो पहिल्या क्रमांकावर कायम आहे. वानखेडेवर सूर्याने केवळ 7 धावा केल्या होत्या. सूर्याशिवाय टॉप 10 मध्ये एकही भारतीय फलंदाज नाही.
View this post on Instagram
नवा टी-२० कर्णधार हार्दिक पंड्याच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. तो आता गोलंदाजी क्रमवारीत 76 व्या स्थानावर पोहोचला आहे.
श्रीलंकेच्या दृष्टिकोनातून, वानिंदू हसरंगा गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात त्याने 22 धावांत 1 बळी घेतला होता. त्याने फलंदाजीत हात दाखवताना 21 धावांची खेळीही खेळली, ज्यामुळे तो अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत 2 स्थानांनी पुढे 5व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजीत एकही भारतीय गोलंदाज अव्वल 10 मध्ये नाही.

आता टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध आणखी दोन टी-20 सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांना आपली स्थिती सुधारण्याची संधी आहे.