8 चौकार, 7 षटकार…. यजुवेंद्र चहलला एकामागे एक दोन जबरदस्त षटकार ठोकत ‘डेवॉन कॉनवे’ने साजरे केले आपले शतक, न्यूझीलंडला आजूनही विजयासाठी इतक्या धावांची गरज..
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील ३ वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज इंदोरमध्ये खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली आणि संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचे लक्ष ठेवले.

प्रत्युतरात पहिला विकेट शून्य धावावर गमवल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुद्धा संघाला चांगली सुरवात करून दिली. ज्यात फलंदाज डेवॉन कॉनवे ने जबरदस्त फलंदाजी करत शानदार शतक ठोकले आहे. डेवॉन कॉनवेने आपल्या या खेळीत मैदानच्या चारी दिशेने फटके मारले.
या खेळीत त्याने आतापर्यंत 78 चेंडू खेळून 108 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 8 चौकार आणि 7 षटकार ठोकले आहेत. कोनवे आजूनही मैदानावर फलंदाजी करत आहे. तर दुसरीकडे मिचेल 24 धावा करून खेळत आहे.
न्यूझीलंडचा संघ अजूनही 202 धावांनी मागे असून त्यांचे दोन गडी बाद होऊन पव्हेलीयनमध्ये परतले आहेत.
टीम इंडियाकडून रोहित-शुभमनने ठोकले शतक..
भारतीय डावाची सुरवात करण्यास आलेले कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी जबदरस्त फलंदाजी करत जवळपास 27 षटके फलंदाजी केली. यादरम्यान या दोघांनीही आपापले शतके साजरी केली. कर्णधार रोहित शर्माने 85 चेंडू खेळत 101 धावा केल्या तर सलामीवीर शुभमन गिलने सुद्धा 78 चेंडूंचा सामना करत शानदार 112 धावा काढल्या.
हे ही वाचा..
धोनी अन् विराटला मागे सोडत रोहित शर्मा ठरलाय ‘बॉस’, ‘या’ बाबती केलाय वर्ल्ड रेकॉर्ड!
अखेर केएल राहुल झाला शेट्टी कुटुंबाचा जावई! लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल