आपल्या देशामध्ये अनेक खेळ खेळले जातात यामध्ये कब्बडी, कुस्ती, खो खो, हॉकी परंतु आपल्या देशात सर्वात जास्त क्रिकेट चे वेड आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात.
आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तर देशातील सर्वाधिक लोकांची पसंती ही क्रिकेट खेळला आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा भारत आणि पाकिस्तान सामना असतो त्यावेळी तर फॅन्स ची वेगळीच क्रेझ असते. हे आपल्याला माहीतच आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दोन्ही संघाकडून म्हणजेच भारत आणि पाकिस्तान संघामधून खेळले आहेत.

गुल मोहम्मद:-
गुल मोहम्मद हा खेळाडू भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर 8 सामने खेळले आहेत. तसेच पाकिस्तानी संघासाठी त्यांनी 1 सामना खेळला आहे. सुरुवातीला गुल मोहम्मद हे भारतामध्ये राहत होते परंतु 1995 साली ते पाकिस्तान मध्ये गेले आणि पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळू लागले.
अब्दुल हफीज कारदार :-
या यादीत अब्दुल हफीज कारदार यांच्या नावाचाही समावेश आहे. फाळणीपूर्वी त्यांनी भारतिय संघासाठी तीन कसोटी सामने खेळले होते. मात्र भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यांनी पाकिस्तानसाठी 23 कसोटी सामने खेळले. त्याला काही सामन्यांमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपदही मिळाले होते.
आमिर इलाही :-
अमीर इलाही 1947 च्या फाळणीच्यापूर्वी भारतीय क्रिकेट ससंघाकडून खेळायचे. पण फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्यावर त्यांनी पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी पाच कसोटी सामने खेळले.