IND vs BAN: कुलदीप यादवने मोडले बांग्लादेशचे कंबरडे, दोन्ही डावात मिळून घेतल्या एवढ्या विकेट, भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत मोठा विजय, सोशल मिडियावर चाहते खुश
IND vs BAN: कुलदीप यादवने मोडले बांग्लादेशचे कंबरडे, दोन्ही डावात मिळून घेतल्या एवढ्या विकेट, भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत मोठा विजय, सोशल मिडियावर चाहते खुश
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 404 धावांची मोठी धावसंख्या उभारली, ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशला केवळ 150 धावा करता आल्या.
यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करताना २५८ धावांवर डाव घोषित केला आणि बांगलादेशला ५७२ धावांचे लक्ष्य दिले. ज्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ केवळ 324 धावा करू शकला. भारताकडून कुलदीप यादवने या सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या.
बांगलादेशने चांगली सुरुवात केल्यानंतर विकेट गमावल्या.
Virat Kohli and Shubman Gill in 1st test #INDvBAN
Yesterday Today pic.twitter.com/PjNIY62K0X
— Akshat (@AkshatOM10) December 16, 2022
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात आघाडी घेत भारतीय संघाने 298 धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि बांगलादेशला 572 धावांचे लक्ष्य दिले.
या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली पण नंतर विकेट गमावल्या. झाकीर हसनने संघाकडून शतक झळकावले, तर नजमुल शांतो आणि शाकिब अल हसन यांनीही अर्धशतके झळकावली मात्र त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.
India beat Bangladesh by 188 runs to win 1st Test Match!
Kuldeep Yadav was announced Player of the Match for his 40 runs with bat & 9 wicket haul in a game!
India moves to 3rd spot WTC 2023!#BANvIND#BANvsIND pic.twitter.com/GAwPL4wvkh
— Nilesh G (@oye_nilesh) December 18, 2022
याआधी बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसन (100) पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून बाद झाला. त्याने 224 चेंडूत 100 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला. यासह पदार्पणात शतक झळकावणारा तो बांगलादेशचा चौथा खेळाडू ठरला आहे. झाकीरच्या आधी तीन खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. यामध्ये अमिनुल इस्लाम, मोहम्मद अश्रफुल आणि अबुल हसन यांच्या नावांचा समावेश आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, केएल राहुल (क), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (डब्ल्यूके), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (क), मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (वा), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, इबादत हुसेन
हेही वाचा: