भारतीय संघाच्या या स्टार क्रिकेटरला गँगस्टर व्हायचं होतं, स्वतःच केला धक्कादायक खुलासा.
आपल्या देशात सर्वात जास्त क्रिकेट खेळाचे वेड आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट प्रत्येकाला आवडते. तसे क्रिकेट मध्ये करियर करायचं असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे मेहनत आणि कष्ट केले पाहिजेत. सर्वसाधारणपणे आपल्या देशाची लोकसंख्या ही 125 हजार करोड आहे परंतु त्यामधील फक्त 15 खेळाडू च देशासाठी खेळतात मग तुम्हीच विचार करा किती मेहनत घ्यावी लागत असेल.

आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ची वेगवेगळी स्वप्न असतात. कोणाला डॉक्टर कोणाला इंजिनिअर तर कोणाला ॲक्टर होयच असत परंतु चक्क एका क्रिकेटर ने मुलाखती मध्ये सांगितलं की मला गँगस्टर व्हायचं होत, तर मित्रांनो जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू.
तर मित्रांनो त्या खेळाडू च नाव आहे शुभमन गिल. शुभमन गिलने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. प्रशिक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला शुभमन गिल यांनी उत्तर दिले. प्रशिक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात शुभमन गिल म्हणाले की, रोज जिममध्ये मी 2 तास घालवल्यानंतर तो 3 ते 4 तास सराव करतो. पण जेव्हा शुभमन गिलला विचारण्यात आले तुमचे बालपणी चे स्वप्न काय होते.
त्यावेळी तो पटकन म्हणाला, की मला गँगस्टर व्हायचं होतं. मग तो लगेच म्हणाला आय मीन क्रिकेटर व्हायचं होत, असे त्यांन अत्यंत गमतीने सांगितले. शुभमन गिलने या काळात आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंची नावेही घेतली. तो म्हणाला की त्याला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली खूप आवडतात आणि त्याला मॅचनंतर थंड आंघोळ करायलाही आवडते. ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी मी नियमित करतो असे सुद्धा त्याने सांगितले.
शुभमन गिलच्या क्रिकेट म्हणजेच आयपीएल करियर बद्दल सांगायचे झाले तर, गेल्या वर्षी शुभमन गिल गुजरात टायटन्सकडून खेळताना 16 सामन्यांत 483 धावा केल्या होत्या. यावेळीही शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून आगामी मोसमात तो अपेक्षित आहे. तसेच लवकरच भारतीय संघात खेळण्याची संधी सुद्धा मिळू शकते.