कोणी 12 वी पास तर कोणी 9 वी नापास, जाणून घ्या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू किती शिकले आहेत, हा खेळाडू तर शाळेत सुद्धा गेला न्हवता.
आपल्याकडे अशी समजूत आहे की जर जास्त आणि चांगले उच्च शिक्षण घेतले तर चांगली नोकरी लागेल चांगला पैसा मिळेल अशी बऱ्याच लोकांची समजूत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का जगात अनेक मोठी आणि श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे कसलेच शिक्षण नाही. तरी सुद्धा ते लोक जीवनात यशस्वी आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे किती शिक्षण झाले आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
तुम्हाला माहीतच असेल भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडू आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत कोणी 8 पास तर कोणी 10 वी नापास असे अनेक दिग्गज खेळाडू भारतीय संघात आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांचे शिक्षण हे केवळ 12 वी पर्यंतच झाले आहे. क्रिकेट मध्ये चांगले प्रदर्शन केल्यामुळे शालेय जीवनात त्यांना अनेक क्रिकेट संधी मिळाल्या.

भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज केएल राहुलने आपले सुरुवातीचे शिक्षण हे बंगळुरू येथील एनआयटी स्कूलमधून केले. त्यानंतर त्याने मधेच शिक्षण सोडून दिले.
भारतीय संघाचे माजी कर्णधार तसेच भारतीय क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज तसेच जगभर प्रसिद्ध असलेले विराट कोहली चे शिक्षण हे केवळ 9 वी पर्यंत झालेले आहे. नंतर पुढे वेळ मिळेल तसेच शिक्षण घेऊन विराट कोहली ने 12 वी पास केली.
ऋषभ पंत- ऋषभ पंतने आपले ग्रॅज्युएशन बी.कॉम.ची पदवी घेऊन पूर्ण केले आहे. पण त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्यात जास्त रस होता. त्यामुळे ऋषभ पंत ने शाळेवर जास्त भर दिला नाही.
भारतीय संघातील ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या फक्त 8 वी पर्यंत शिकला आहे पुढे 9 वी च्या वर्गात नापास झाल्यावर हार्दिक पांड्या ने शाळेला रामराम ठोकला.
भारतीय क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह हे दोन्ही खेळाडू 12वी पास आहे, तर अक्षर पटेल पदवीधर होऊ शकला नाही. त्याने पदवीला प्रवेश घेतला होता. परंतु क्रिकेट मुळे त्याने तिकडे दुर्लक्ष केले.
भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल, अर्शदीप सिंग – भुवनेश्वर कुमार यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. याच हर्षल पटेलने बॅचलर डिग्री मिळवली आहे. अर्शदीप सिंगबद्दल बोलायचे तर तो पदवीधर आहे.