Indian cricketers who doesn’t hit six :भारतीय संघातील हे 3 दिग्गज खेळाडू टी-२० आणि एकदिवशीय क्रीकेटमध्ये एकही षटकार ठोकू शकले नाहीत, नावावर आहे नकोसा विक्रम..!

0
47
Indian cricketers who doesn't hit six :भारतीय संघातील हे 3 दिग्गज खेळाडू टी-२० आणि एकदिवशीय क्रीकेटमध्ये एकही षटकार ठोकू शकले नाहीत, नावावर आहे नकोसा विक्रम..!
ad

Indian cricketers who doesn’t hit six:  भारतीय क्रिकेट सर्किटमध्ये अनेक महान खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले. शिवाय याच क्रिकेट सर्किटमध्ये काही असेही खेळाडू आहेत ज्यांच्या नावे क्रिकेटमधील नकोसे विक्रम जमा झाले आहेत. अश्याच एका विक्रमाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  टीम इंडियाचे असे तीन खेळाडू आहेत ज्यांना वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये एकही षटकार मारता आलेला नाही (Indian cricketers who doesn’t hit six), असे कोणी म्हटले तर कदाचित त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. आपण भारतीय क्रिकेट संघातील अशा तीन स्टार क्रिकेटर्सवर एक नजर टाकूया ज्यांना आजपर्यंत T20 आणि ODI क्रिकेटमध्ये एकही षटकार मारता आलेला नाही (Indian cricketers who doesn’t hit six).

Indian cricketers who doesn't hit six
Indian cricketers who doesn’t hit six

या खेळाडूंना टी-२० आणि एकदिवशीय क्रिकेटमध्ये एकही षटकार मारता आला नाहीये. (Indian cricketers who doesn’t hit six)

1. कुलदीप यादव (Kuldeep Yadav)

टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळतो. कसोटी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात करणाऱ्या कुलदीप यादवने अद्याप वनडे आणि टी-20मध्ये एकही षटकार मारलेला नाही. कुलदीप यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 103 सामने आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 सामने खेळले आहेत. एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुलदीप यादवने अद्याप एकही षटकार मारलेला नाही.

Indian cricketers who doesn't hit six :भारतीय संघातील हे 3 दिग्गज खेळाडू टी-२० आणि एकदिवशीय क्रीकेटमध्ये एकही षटकार ठोकू शकले नाहीत, नावावर आहे नकोसा विक्रम..!

2. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

युजवेंद्र चहलने 2016 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आत्तापर्यंत चहलला जे काही चेंडू फलंदाजीला मिळाले, त्याला एकही षटकार मारता आलेला नाही. आतापर्यंत, त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 13 चेंडू खेळले आहेत आणि एकदिवसीय सामन्यात 141 चेंडूंचा सामना केला आहे, परंतु तरीही तो त्याच्या बॅटमधून षटकार येण्याची वाट पाहत आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे चहलने लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 3 षटकार मारले आहेत. जेव्हा त्याच्या बॅटमधून षटकार येतो तेव्हा त्याचे सहकारी खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये नाचत असतात. तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये एकूण 152 सामने खेळला आहे, परंतु त्याला अद्याप कसोटीत संधी मिळालेली नाही.

3. इशांत शर्मा (Ishant Sharma)

Indian cricketers who doesn't hit six
Image Courtesy- BCCI/Delhi Capital

इशांत शर्माने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी आतापर्यंत एकही षटकार मारलेला नाही. इशांत शर्मा सध्या भारताकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळत नाही. 2007 मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इशांत शर्माने सर्वात लांब फॉरमॅटमध्येही एकदा षटकार ठोकला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2568 चेंडू खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीतही अर्धशतक आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटसह एकूण 199 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

तर मित्रांनो हे होते ते, खेळाडू ज्यांना अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  भारतीय संघाकडून खेळतांना एकदाही टी-२० किंवा एकदिवशीय सामन्यात षटकार ठोकता आला नाहीये. (Indian cricketers who doesn’t hit six) वरीलपैकी तिन्हीही खेळाडू हा विक्रम आपल्या नावावर करून खेळत आहेत. आशा आहे येणाऱ्या काही दिवसांत यांपैकी कुणीतरी हा नकोसा विक्रम आपल्या नावावरून कमी करेल आणि एक तरी षटकार मारेल. क्रिकेटबदलचे असेल रंजक विक्रम, किस्से आणि बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फोलो जरूर करा..


हेही वाचा:

Champion Trophy 2025: गौतम गंभीरचा मोठा निर्णय, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हे 15 खेळाडू जाणार पाकिस्तानमध्ये..!

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच जखमी झाले होते हे 5 कसोटीपटू, एकाचे तर करिअरच पहिल्या सामन्यात संपले..!