INDvsAUS: आशिया चषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या निशाण्यावर ऑस्ट्रोलिया, पहा कधी कुठे खेळवले जाणार सामने..

0
10729
ad

INDvsAUS: आशिया चषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या निशाण्यावर ऑस्ट्रोलिया, पहा कधी कुठे खेळवले जाणार सामने..


भारतीय क्रिकेट संघ 2023 विश्वचषकापूर्वी (ODI Worldcup 2023) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 T20I सामन्यांची मालिका होणार आहे, त्यापैकी 3 एकदिवसीय सामने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी खेळवले जातील. विश्वचषकानंतर 5 टी-20 सामन्यांची मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ती 5 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

आशिया चषकानंतर अवघ्या 4 दिवसांनी सुरू होणाऱ्या या मालिकेमुळे भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी सर्वोत्तम संघ शोधण्याची संधी मिळणार आहे, तर ऑस्ट्रेलियन संघात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्टीव्ह स्मिथ यांचे पुनरागमन होणार आहे. हे तिघेही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकले नाहीत. या मालिकेसाठी ग्लेन मॅक्सवेलही उपलब्ध असेल.

INDvsAUS

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे पूर्ण वेळापत्रक (ind vs aus odi series shedule)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना: 22 सप्टेंबर 2023 (शुक्रवार), मोहाली, दुपारी 1:30 वाजता

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय: 24 सप्टेंबर 2023 (रविवार), इंदूर, दुपारी 1:30 वाजता

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय: 27 सप्टेंबर 2023 (बुधवार), राजकोट, दुपारी 1:30 वाजता

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी दोन्ही संघ (ind vs aus teams squad)

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत, बी. शमी, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.

INDvsAUS

तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुनील , कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनी , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

 

 

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत