आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात परंतु सर्व खेळात जास्त वर्चस्व हे क्रिकेट खेळाचे आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट प्रत्येकालाच आवडते. तसेच युवा पिढी क्रिकेट कडे जास्त आकर्षित होताना आपल्याला दिसत आहे.

बॉलिवूड आणि क्रिकेट म्हटल तर आपल्या समोर येते ते म्हणजे आरामदायी आयुष्य, पैसा आणि प्रसिद्धी. क्रिकेटर लोकांचे आयुष्य हे सामान्य माणसापेक्षा खूप वेगळे आहे. त्याचे महागडे राहणीमान, महागडे कपडे आणि महागड्या गाड्या यामुळे सामान्य माणसाला त्याची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या विदेशी खेळाडू बद्दल सांगणार आहे जे भारतीय मुलींच्या प्रेमात पडुन लग्न केले आहेत तर जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.
शोएब मलिक :-
पाकिस्तान क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज शोएब मलिक ने 2010 साली भारताची टेनिस पटू सानिया मिर्झा बरोबर लग्न केले. या दोघांच्या बऱ्याच अफवा पसरत आहेत. सध्या खूप दिवसांपासून हे एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
शॉन टैट :-
ऑस्ट्रेलिया संघाचे गोलंदाज शॉन टैट या खेळाडू ने 2014 साली भारताची मॉडेल आणि अँकर माशूम सिंघासोबत लग्न केले. बऱ्याच दिवस रेलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014 साली लग्न केले.
मुथैया मुरलीधरन :-
श्रीलंका संघाचे माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 2005 मध्ये भारतीय महिला मधिमलार राममूर्तीशी लग्न केले. दोघांना नरेन आणि कृष्णा अशी एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
माईक ब्रेर्ली:-
इंग्लंडचा माजी कर्णधार माईक ब्रेअरली भारत दौऱ्यावर आला तेव्हा म्हणजेच 1976 साली भारतीय महिला माना साराभाईशी लग्न केले. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला तेव्हा एकमेकांची भेट झाली. तेव्हा परत डेटिंग करणे शक्य नसल्यामुळे दोघांनी लगेच लग्न केले.