- Advertisement -

Records: भारतीय संघातील ‘हे’ 5 खेळाडू शक्तीपेक्षा जास्त युक्ती वापरून क्रिकेट खेळतात, लिस्टमध्ये स्वतः क्रिकेटचा देव सुद्धा दाखल…

0 8

Records: भारतीय संघातील ‘हे’ 5 खेळाडू शक्तीपेक्षा जास्त युक्ती वापरून क्रिकेट खेळतात, लिस्टमध्ये स्वतः क्रिकेटचा देव सुद्धा दाखल…


भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वामध्ये संपूर्ण जगात स्वतःचा दरारा निर्माण केलेला आहे. १९८३ साली भारताने जिंकलेल्या एकदिवसीय सामन्याच्या विश्वकपाने भारतीय संघाची जी उंची संपूर्ण जगतात क्रिकेट क्षेत्रामध्ये वाढली ती उंची कायम ठेवण्याचं काम भारतीय संघाच्या पाच खेळाडूंनी केलं आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

इतर देशाच्या खेळाडूंच्या तुलनेत भारतीय संघाचे खेळाडू हे अतिशय नम्रपणे वागताना, खेळतांना आपल्याला आढळून येतात. लांब आणि मोठ्या पल्ल्याच्या धावा काढण्यात तरबेज असताना सुद्धा या लोकांच्या वागण्यामध्ये कधीही आक्रमकता किंवा आक्रसताळेपणा दिसून येत नाही. त्यामुळेच भारतीय संघावर विशेष प्रेम जगभरातून असलेले आपल्याला दिसून येते.

सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) या सुप्रसिद्ध खेळाडूला तर संपूर्ण जग ओळखते. त्याचा स्वभाव, त्याचा नम्रपणा आणि चलाख बुद्धीने दोन खेळाडूंच्या मधून चौकार मारणारा सचिन अशी त्याची ख्याती असून त्याला क्रिकेट जगतात ‘ मास्टर ब्लास्टर ‘ तसेच ‘ क्रिकेटचा देव ‘ म्हणून उपाधी मिळालेली आहे.

या लेखामध्ये आम्ही त्या पाच खेळाडूंची नावे आपल्याला सांगणार आहोत  ज्यांचे योगदान भारतीय क्रिकेट संघासाठी खूप मोलाचे आहे. आणि जे मैदानावर डोक्याने, युक्तीने खेळून प्रतिस्पर्धी संघाच्या घशात गेलेला सामना सुद्धा खेचून आणण्याची ताकद ठेवतात.

Wasim Jaffer ' a legend who was denied international stardom

वसीम जाफर (Vasim Jafar)

यामध्ये वसीम जाफर(Vasim Jafar) या खेळाडूचे नाव पाचव्या स्थानावर आपण घेऊ. नम्र स्वभावाचा वसीम आपल्या घरगुती क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला अनेक वेळा दिसला असेल. भारतीय संघ किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची पुरेशी संधी मिळू शकली नाही. त्यामुळेच कदाचित याची वर्णी पाचव्या स्थानावर लागली असेल. मात्र, याच्यामधले कौशल्य पाहता वसीमराव जाफर जर भारतीय संघासाठी अनेक काळ खेळला असता तर आज पहिला मानाचा मुजरा त्याला करावा लागला असता.

युवराज सिंग(Yuvraj Singh)

संपूर्ण जगात सिक्सर किंग या नावाने ओळखला जाणारा युवराज सिंग हा थोडासा तापट स्वभावाचा जरी असला तरी मैदानावर तो ज्या पद्धतीने खेळायचा त्याचे ते अप्रतिम खेळणे पाहून क्रिकेटवर प्रेम करणारे अनेक जण त्याला आपलं हृदय देऊन बसायचे. न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात सहा बॉल मध्ये सहा सिक्स मारून तर त्याने असामान्य विक्रम स्वतःच्या नावे केला होता. युवराजचे बोलणे , दिसणे आणि मैदानावर युवराजचं क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टी केवळ युवराजचं करू शकतो असे वाटते. कालांतराने त्याला झालेल्या कर्करोगामुळे तो क्रिकेट जगातून थोडा बाहेर गेला. मात्र जाताना आपली असामान्य छाप त्याने क्रिकेट विश्वात उमटवली.

खेळाडू रोहीत शर्मा

विराट कोहली (Virat Kohali)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नंतर क्रिकेटमध्ये ज्याने सर्वांत जास्त मैदान गाजवले ते  विराट कोहलीने .. तो थोडा आक्रमक जरूर आहे परंतु डुबणारी मॅच कशी काढायची याचे कौशल्य विराट मध्ये पुरेपूर भरलेले आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushaka Sharma) सोबत त्याचे लग्न झालेले आहे. विराट आपल्या फिटनेस बाबत अधिक जागृत असतो. आणि तो एकाच वेळी फिनिशर किंवा मोठी पारी सुद्धा खेळू शकतो. विराट संघात खेळत असला की भारत मॅच जिंकेल अशी प्रेक्षकांना खात्री असते. आपल्या जादुई करामतीने आज विराटने जगभरात आपले फॉलोवर्स निर्माण केलेले आहेत.

रोहित शर्मा  (Rohit Sharma)

अत्यंत देखणा, अत्यंत नम्र आणि शालिनीतेने वागणारा म्हणून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची(Rohit Sharma) इमेज आपल्या डोळ्यांसमोर निर्माण होते. रोहित मध्ये इतकी क्षमता आहे की त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन (Mumbai Indians)  संघाला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन (5 time ipl champion team)  बनवले आहे. विराटच्या(Virat Kohali) पाठोपाठ रोहित वर सुद्धा अनेकांचे प्रेम आहे आणि खात्री देखील आहे की रोहित शर्मा संघात आहे तर भारतीय संघाला कोणीही नमवू शकत नाही.

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)

या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा दर्जा जर कोणाचा लागत असेल तर तो म्हणजे सर्वांचा लाडका महेंद्रसिंग धोनी याचा. तुम्ही सुद्धा महेंद्रसिंग धोनीला(Mahendra Singh Dhoni) अनेक वेळा टीम इंडिया गमावत असलेला सामना खेचून आणताना पाहिलं असेल.

खेळाडू

महेंद्रसिंग धोनीचे (Mahendra Singh Dhoni)  एक वैशिष्ट्य असे आहे की, संघ जेवढा प्रेशर मध्ये असेल ; महेंद्रसिंग धोनी तेवढा अधिक संयमी आणि तेवढा कुशल असलेला आपल्याला दिसून येते. सहसा दबावाला तो बळी न पडता आपल्या कौशल्याच्या जोरावर आपल्या संघाला सावरतो. असे अनेक सामने आपण पाहिले असेल. त्यामुळेच महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)  हा एक चलाख खेळाडू म्हणून नावारुपास आलेला आहे. आपल्याला एक गोष्ट सांगताना आनंद होतो की, ‘हेलिकॉप्टर शॉट’ हा शॉट महेंद्रसिंग धोनीच्यानावाने ओळखला जायला लावला. शक्ती पेक्षा युक्तीने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी म्हणूनच पहिल्या क्रमांकावर आहे..

तर मित्रानो हे होते काही खेळाडू जे टीम इंडियाकडून खेळतांना शक्ती पेक्षा जास्त युक्तीचा वापर करून टीम इंदियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. यांपैकी तुमचा आवडता खेळाडू कोणता कमेंट करून नक्की सांगा..


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

 

Leave A Reply

Your email address will not be published.