भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी -२० मालिकेतील अंतिम सामना १ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. चला तर जाणून घेऊया तिसऱ्या टी -२० सामन्यासाठी भारतीय संघात कुठले बदल केले जाऊ शकतात.
तिसऱ्या आणि अंतिम टी -२० सामन्यात भारतीय संघाची सलामीवीर जोडी बदलली जाऊ शकते. पहिल्या आणि दुसऱ्या टी -२० सामन्यात शुभमन गिल आणि ईशान किशन हे दोघे सलामीला येत होते. मात्र तिसऱ्या टी -२० सामन्यात ईशान किशन ऐवजी पृथ्वी शॉला संघात स्थान दिले जाऊ शकते. तसेच राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता,त्याला या क्रमांकावर हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. त्यामुळे सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो.
मध्यक्रमात होऊ शकतो,महत्वाचा बदल..
तिसऱ्या टी -२० सामन्यासाठी मध्यक्रमात महत्वाचा बदल पाहायला मिळू शकतो. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हार्दिक पंड्या युवा फलंदाज जितेश शर्माला संधी देऊ शकतो. जितेशने आयपीएल स्पर्धेतील १२ सामन्यांमध्ये २३४ धावा केल्या आहेत.
तर पाचव्या स्थानी हार्दिक पंड्या फलंदाजीला येऊ शकतो. तर सहाव्या स्थानी अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. तर सातव्या स्थानी चांगल्याच फॉर्ममध्ये असलेला वॉशिंग्टन सुदंर फलंदाजीला येऊ शकतो.
या गोलंदाजांना मिळू शकते संधी..
अंतिम सामन्यात फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाजी करण्यासाठी उमरान मलिक, शिवम मावी आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.
हे ही वाचा..
रांचीतील लहान मुलांच्या गोलंदाजीवर एमएस धोनीची तुफान फटकेबाजी; पाहा व्हिडिओ..
‘शाहीन समोर बुमराह काहीच नाही..’ पाकिस्तानी दिग्गजाचे बुमराह बद्दल वादग्रस्त वक्तव्य