IPL 2023: सर्व मेहनतीवर ‘पाणी’, गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग IPL चा पहिलाच सामना रद्द?
आपल्या देशातील तरुण पिढी वर्षभर आयपीएल सुरुवात होण्याची वाट पाहत असते. आपल्या देशात अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट खेळाचा मोह आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी देशातून सर्वाधिक पसंती ही क्रिकेट खेळला मिळते.
आजपासून IPL च्या 16 व्या सिझन ला सुरुवात होणार होती. यंदा चा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघामध्ये होणार होता. परंतु अचानक हा सामना रद्द झाला आहे त्यामुळं तरुण पिढी वैतागली आहे.

आयपीएल चा आजचा होणार सामना हा गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम वर 7.30 वाजता होणार होता. मात्र सामन्याच्या आधीच म्हणजे 30 मार्च रोजी संध्याकाळी उशिरा अहमदाबाद आणि स्टेडियमच्या आसापासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु होण्याआधी गुजरात टायटन्स संघाचे खेळाडू हे सराव करत होते. मात्र पाऊस आल्याने खेळाडू आडोशाला निघून गेले. गुजरात टायटन्सने पावसाचा व्हीडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गुजरातचा कोच आशिष नेहरा पावसाची मजा घेताना दिसत आहे.
Tyamule हा सामना रद्द होणार का अशी भीती प्रत्येकालाच लागून राहिली आहे. तसेच जर का आज अहमदाबाद येथल वातावरण साफ राहिले तर आयपीएल चा पहिला सामना हा होऊ शकतो असे सुद्धा सांगितले आहे.
या खेळाडूंचा असेल समावेश:-
चेन्नई सुपर किंग संघ:-
एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश थिक्शाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, कायले जेमीन्सन, अजय मंडल आणि भगत वर्मा.
गुजरात टायटन्स टीम:-
हार्दिक पांड्या (कॅप्टन), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मैथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे आणि साईं सुदर्शन.