एबी डिव्हिलियर्सने केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला- ही टीम बनेल IPL 2023 चा विजेता
क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत चालले आहे. शिवाय आजकाल क्रिकेट प्रेमींनी संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आपल्या देशातील सर्वाधिक तरुण आयपीएल मोठ्या आवडीने पाहतात. भारतात T20 फॉरमॅट मध्ये आयपीएल असल्यामुळे अनेक रेकॉर्ड आपल्याला आयपीएल मध्ये पाहतात येतात.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला एबी डिव्हिलियर्सने केलेल्या भविष्यवाणी बद्दल सांगणार आहे एबी डिव्हिलियर्स च्या मते यंदा च्या वर्षी आयपीएल 2023 मध्ये कोणता संघ जिंकेल याचे सविस्तर माहिती दिली आहे.

यंदा 31 मार्चपासून आयपीएलचा 16 व्या सीझन ला सुरुवात होणार आहे. मागील सिझन मध्ये गुजरात टायटन्स संघाने आयपीएल चे विजेतेपद पटकावले होते. अलीकडेच, क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सला आयपीएल 2023 च्या विजेत्या संघाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा एबी डिव्हिलियर्सने ने कोणता संघ यंदा जिंकू शकतो हे सांगितले आहे.
बेंगळुरू येथील झालेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या अनबॉक्स एक्सपिरियन्स इव्हेंटमध्ये एबी डिव्हिलियर्स सहभागी सुद्धा झाला होता. यावेळी संघाची जर्सी लाँच करण्यात आली आणि या इव्हेंट मध्ये विराट कोहली आणि ख्रिस गेल देखील उपस्थित होते. यावेळी एबी डिव्हिलियर्सने एक मोठी भविष्यवाणी केली आहे की यावेळी आरसीबी आयपीएल 2023 चा विजेता होईल. असे एबी डिव्हिलियर्सने भविष्यवाणी केली आहे.
एबी डिव्हिलियर्स म्हणाला की माझ्या मते, सध्या बेंगलोर हा संघ खूप मजबूत आहे आणि आम्हाला सुरुवातीच्या इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही. त्याऐवजी, आम्ही चाहते म्हणून संघाला पाठिंबा आणि गाईड करणार आहे जेणेकरून ते ट्रॉफी आणतील. कृपया सांगा की या दरम्यान ख्रिस गेल ने पुन्हा संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
तसेच एबी डिव्हिलियर्सने म्हंटलाकी बंगळुरू संघासाठी खेळणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. तसेच मी नेहमी च आरसीबी ला सपोर्ट करत राहील.
तसेच यंदा च्या वर्षी आरसीबी संघ हा इतर संघापेक्षा मजबूत आहे त्यामुळे यंदा च्या वर्षी आरसीबी अगदी सहजपणे आयपीएल जिंकेल असे सुद्धा म्हंटले आहे. यंदा च्या वर्षी आरसीबी संघात फाफ डू प्लेसिस (क), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फिन ऍलन, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, मायकेल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेझलवूड, महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भंडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.