भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील उर्वरित २ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात एका घातक गोलंदाजाला संधी दिली गेली आहे. मात्र त्याला संधी मिळणं कठीण दिसून येत आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यावेळी बीसीसीआयने ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी रिलीज केले होते. तसेच जयदेव उनाडकटला आता उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळवण्याची शक्यता खूप कमी आहे.
या मालिकेत रोहित शर्माने केवळ २ वेगवान गोलंदाजांचा वापर केला आहे. ते गोलंदाज म्हणजे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज. या दोघांनीही कर्णधाराचा विश्वास जिंकत चांगली कामगिरी केली आहे. ही कामगिरी पाहता जयदेव उनाडकटला येणाऱ्या सामन्यांमध्ये बाहेर बसावं लागू शकतं.

जयदेव उनाडकटला बांगलादेश विरुध्द शेवटचा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने ५० धावा खर्च करत २ गडी बाद केले होते.