म्हणून रिषभ पंतला बाहेर काढून त्याएवजी चेतेश्वर पुजाराला कसोटी संघाचा उपकर्णधार केले. लोकेश राहुलने सांगितले मोठे कारण..
टीम इंडिया सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार असून त्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे.
अशा स्थितीत त्याच्या जागी केएल राहुल कर्णधारपद भूषवणार आहे. पहिल्या कसोटीपूर्वी राहुलने चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या बाबत मोठे वक्तव्य केले आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे होणार आहे.
View this post on Instagram
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबर पासून खेळवला जाणार आहे. हा सामना चट्टोग्राम येथे होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा पहिला कर्णधार केएल राहुलने मीडियाला संबोधित करताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
ऋषभ पंतला उपकर्णधारपदा वरून हटवण्यावर त्याने आपले मत मांडले आहे. पत्रकार परिषदे दरम्यान एका पत्रकाराने केएल राहुलला विचारले की, मागच्या वेळी ऋषभ पंत उपकर्णधार होता पण आता चेतेश्वर पुजारा आहे, त्यामुळे तुमच्याशी याबाबत काही संवाद झाला आहे का?
View this post on Instagram
त्याला उत्तर देताना केएल राहुल म्हणाला, उपकर्णधार कोण निवडतो हे मला माहित नाही? जो कोणी निवडला जाईल त्याचे आम्ही स्वागत करतो. मला जेव्हा उपकर्णधार बनवण्यात आले तेव्हाही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती पण संघाची जबाबदारी तुमच्यावर आहे.
यात खरोखर फारसा बदल होत नाही, प्रत्येकाला त्यांची भूमिका आणि जबाबदारी माहित आहे आणि संघ त्यांच्या योगदानाची प्रशंसा करतो. ऋषभ आणि पुजारा दोघेही आमच्यासाठी विलक्षण आहेत आणि त्यांनी काही वेळा चांगले काम केले आहे. आपण खरोखर इतका विचार करत नाही.

पहिल्या कसोटी साठी पंतला उपकर्णधार बनवण्यात आले होते पण नंतर चेतेश्वर पुजाराला उपकर्णधार बनवण्यात आले. विशेष म्हणजे, बांगलादेश विरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबर रोजी खेळला जाईल, जो १८ डिसेंबर पर्यंत चालेल.
हा सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम येथे खेळवला जाईल तर दुसरा सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियम येथे २२ ते २६ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. बांगलादेश आणि भारत यांच्यात एकूण ११ कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ९ भारताने जिंकले आहेत तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत.
हेही वाचा: