Uncategorizedक्रीडा

“ज्याची संघात जागा बनत नाही तो कर्णधार होऊन फिरतोय,आणि सामनावीर खेळाडूच्या जागी 12 वर्षापासून न खेळलेला खेळाडू खेळतोय”, कुलदीप यादवला संघातून बाहेर काढताच कर्णधार के.एल. राहुल लोकांच्या निशाण्यावर, सोशल मिडीयावर राहुल करतोय ट्रेंड.

‘ज्याची संघात जागा बनत नाही तो कर्णधार होऊन फिरतोय,आणि सामनावीर खेळाडूच्या जागी 12 वर्षापासून न खेळलेला खेळाडू खेळतोय, कुलदीप यादवला संघातून बाहेर काढताच कर्णधार के.एल. राहुल लोकांच्या निशाण्यावर, सोशल मिडीयावर राहुल करतोय ट्रेंड.


बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन यांनी मिरपूरमधील शेरे बांगला स्टेडियमवर भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या   दुसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी १88 धावांनी भारताने पहिला कसोटी सामना जिंकला होता आणि सिरीज मध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी. टीम इंडियाच्या प्लेईंग  इलेव्हनमध्ये बदल झाला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात स्पिनर कुलदीप यादवच होता आता त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकाटला संधी मिळाली. २०१० नंतर उनाडकाट भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळत आहे. बांगलादेशच्या टीचिममध्ये, मोमिनुल हक आणि एबाद हुसेन यांना यासिर अलीची जागा घेण्याची संधी मिळाली आहे.

कुलदीप यादव सारख्या खेळाडूला संघातून बाहेर केल्यामुळे चाहते प्रचंड संतापले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट घेऊन आणि पहिल्या डावात 40 धावांचे योगदान देऊन सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला तुम्ही कसे काय संघातून बाहेर करू शकता? असा थेट सवाल आता चाहते बीसीसीआयला करत आहेत.

कुलदीप यादव

त्याखेरीज भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल सुद्धा आता चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. एक तर संघात जागा न बनताना सुद्धा त्याला कर्णधार करून बसवलंय आणि दुसरीकडे जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला एक सामना खेळवून संघातून हाकलून दिले. हे न समजण्याच्या पलीकडे आहे. कुलदीपला संघाबाहेर ठेवून तबल 12 वर्षापासून अंतर राष्ट्रीय क्रिकेट मध्ये कसोटी न खेळलेल्या खेळाडूला संघात संधी दिलीय यामागचे लॉजिक सुद्धा चाहते बीसीसीआय ला विचारत आहेत.

कुलदीपला बाहेर करताच सोशल मिडीयावर उमटल्या प्रतिक्रिया.

असे आहेत दोन्ही संघ:

बांगलादेश : नजमुल हुसेन शंटो, झकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकूर रहीम, शकीब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिरज, तैत्सुल इस्लामम

भारत  : केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेटेश्वर पूजर, विराट कोहली,रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अ‍ॅक्सर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकाट, उमेश यादव, मोहमद सिराज


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,