महात्मा गांधींनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामुळे ‘ह्या’ देशाला स्वातंत्र्य मिळाले होते,आजही अर्धा देश चालतो गांधीजींच्या विचारावर..
भारताच्या स्वातंत्र्याच्या ४६ वर्ष अगोदर महात्मा गांधींनी मॉरिशस बेटांना भेट दिली होती, त्याठिकाणी त्यांनी १८ दिवास वास्तव्य केले होते, या काळात त्यांनी मॉरिशस बेटांवर त्यांनी स्थलांतरित भारतीय मजदूरांच्या न्याय हक्कांसाठी मोठ्या चळवळीची सुरुवात केली होती.
मॉरिशसमधील भारतीय मजुरांमध्ये त्यांच्या हक्कांसाठी जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने ३८ वर्षीय महात्मा गांधींनी डॉक्टर मणीलाला या आपल्या मित्राला मॉरिशसला पाठवले आणि त्याठिकाणी हिंदुस्तानी नावाचे त्या देशातील पहिले हिंदी भाषिक वृत्तपत्र सुरू करायला सांगितले. हे भारता बाहेर छापले गेलेले पहिले हिंदी वृत्तपत्र होते.
सर्वेश तिवारी या मॉरिशस स्थित पत्रकाराने लिहलेल्या ‘मॉरिशस: इंडियन कल्चर अँड मीडिया’ या पुस्तकात गांधींच्या प्रभावाखालील ‘हिंदुस्थानि’ या वृत्तपत्रामुळे कशाप्रकारे मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यता आंदोलन उभे राहिले होते, याचे वर्णन करण्यात आले आहे. या वृत्तपत्रामुळे १९३५ साली सेवुसागुर रामगुलम यांच्या नेतृत्वात मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यता चळवळ आकारास आली होती.
तब्बल ३ दशकांच्या दीर्घ संघर्षानंतर मॉरिशस स्वतंत्र झाले होते. १९६८ साली मॉरिशसची ब्रिटिश राजवट संपुष्टात येऊन रामगुलम, हे मॉरिशसचे पहिले पंतप्रधान झाले. ते मॉरिशसमध्ये भारतातून रोजगाराच्या संधीच्या शोधात आलेले एक कामगार होते.
डॉक्टर मणीलाल ज्यांनी हिंदुस्थानी हे दैनिक सुरू केले, ते भारतात ११ ऑक्टोबर १९०७ मध्ये आले होते. ते गांधींचे सहकारी होते. मणीलाल स्वतः एक डॉक्टर होते, त्यांनी मॉरिशसमधील भारतीय मजुरांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
मजुरांच्या नागरी हक्कांसाठी त्यांनि हिंदुस्थानी हे वृत्तपत्र सुरू केले, आधी हे वृत्तपत्र गुजराती आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रसारित होत असे पण कालांतराने हे वृत्तपत्र हिंदी भाषेत प्रकाशित होऊ लागले. हे वृत्तपत्र हिंदीत प्रकाशित करण्याचे खास कारण असे होते की मॉरिशसमध्ये येणारे बहुतांश भारतीय मजूर हे उत्तर प्रदेश, बिहार मधून यायचे, भोजपुरी बोलणाऱ्या लोकांची संख्या मोठी होती. हिंदी वृत्तपत्राने काही काळातच मॉरिशसमध्ये लोकप्रियता मिळवली.
१९०० मध्ये मॉरिशसमध्ये बहुतांश वृत्तपत्र हे फ्रेंच होते. पण हिंदुस्थानी आल्यावर वातावरण पालटले, हिंदी वृत्तपत्र लोकप्रियता मिळवू लागले. काही काळातच मॉरिशसमध्ये १२ हिंदी वृत्तपत्र प्रकाशित होऊ लागले. हिंदुस्थानी वृत्तपत्रामुळे लोकांच्या विचारसरणीत मोठा झाला, मोठ्या संख्येने मजूर स्वातंत्र्याचा लढ्यासाठी तयार झाले.
आजही स्वतंत्र मॉरिशसमध्ये या वृत्तपत्राने लोकांच्या मनाचा ताबा मिळवलेला आहे. आजही मॉरिशसच्या जनतेवर गांधीवादी भारतीय विचारसरणीचा मोठा प्रभाव आहे. अगदी मॉरिशसमध्ये पदोपदी याची जाणीव होत असते. मॉरिशसचे पंतप्रधान पृथ्वीराजसिंह रुपन एकदा म्हणाले होते की जर भारत ‘माता’ असेल तर मॉरिशस ‘पुत्र’ आहे. आजही इथले नागरिक शतकापूर्वीच्या भारतीय मुळाशी जोडलेले आहेत.
मॉरिशसमध्ये आलेल्या भारतीय मजुरांनी तिथे मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. ऊस हे आता तिथले प्रमुख पीक आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार मधून गेलेल्या मजुराने त्याठिकाणी उसाची लागवड केली होती. १८३४ते १९२३ या काळात ४.५० लाख भारतीय मजूर मॉरिशसला स्थलांतरित झाले होते, यापैकी १.५० लाख मजूर परतले तर १.२३ लाख मजूर तिथेच स्थायिक झाले होते. आज मॉरिशसचे बहुसंख्य लोक हे भारतीय वंशाचे आहेत.
ज्यावेळी भारतीय मजूर दक्षिण आफ्रिके जवळील या बेटांवर पोहचले, त्यावेळी त्याठिकाणी डच लोकांचे साम्राज्य होते, त्यानंतर ते ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. मॉरिशसचा रोड्रिंक्स, अगलगा, सेंट ब्रॅण्डन, ट्रोमलीन इत्यादी भागांवर ब्रिटिश वसाहती आधीपासूनच होत्या, १९६८ पर्यंत मॉरिशसच्या सेशल्स बेटांवर ब्रिटिश वसाहत होती.
आज मॉरिशस जगातील काही प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मॉरिशस आणि भारताचे खूप चांगले संबंध असून भारतीय नागरिकांना मॉरिशसमध्ये जायला व्हिसा लागत नाही. मॉरिशस बेट हे आजही भारतीय पर्यटकांचे थायलंडनंतर दुसरे सर्वाधिक आवडते डेस्टिनेशन आहे
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…