धोनीच्या नावावर क्रिकेटच्या अशाच काही अनोख्या विक्रमांची नोंद आहे, जे मोडणे खूप कठीण आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी तसेच आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. भारतीय क्रिकेट संघाचा धोनी मुळे मोठा फायदा झाला आहे हे तुम्हाला माहीतच असेल. कारण धोनी मुळे आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकता आला. धोनी ने भारतीय संघात अनेक वेगवेगळी रेकॉर्ड बनवली जी क्रिकेट इतिहासात कधिनी न मोडणारी रेकॉर्ड आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला महेंद्रसिंग धोनी बद्दल च्या काही रेकॉर्ड बद्दल सांगणार आहे जी सहजासहजी कोणालाही तुटणार नाही. क्रिकेट विश्वात महेंद्रसिंग धोनी ने दबदबा निर्माण केला आहे.

महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज आहे. धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत चमकदार कामगिरी केली आणि एकापेक्षा जास्त विक्रम केले. असे काही विक्रमही त्यांच्या नावावर नोंदवले गेले.
महेंद्रसिंग धोनी 60 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा जगातील एकमेव यष्टिरक्षक आहे. तसेच यष्टीरक्षक कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी ने कसोटी क्रिकेट मध्ये 3454 धावा केल्या आहेत. हा रेकॉर्ड अजून कोणताही खेळाडू मोडू शकला नाही.
महेंद्रसिंग धोनीने आयसीसी टी-20 विश्वचषक, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच एकच फॉरमॅट क्रिकेट मध्ये 3 ट्रॉफी जिंकुन एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे. महेंद्रसिंग धोनी हा कसोटी क्रिकेट मध्ये द्विशतक झळकावणारा एकमेव भारतातील यष्टिरक्षक आहे.
तसेच कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रमही धोनीच्या नावी आहे. धोनी ने कसोटी क्रिकेट मध्ये 256 झेल पकडले आहेत. त्याच्याशिवाय आजपर्यंत भारताच्या एकाही यष्टीरक्षकाला ही कामगिरी करता आलेली नाही.
धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 300 हून अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यामध्ये धोनी ने 321 झेल केले आहेत असे रेकॉर्ड बनवणारा महेंद्रसिंग धोनी एकमेक खेळाडू आहे. तसेच धोनी ने आंतररा्ट्रीय क्रिकेट मध्ये 10 हजार हून अधिक धावा काढल्या आहेत.