- Advertisement -

महेंद्रसिंग धोनीमुळे या खेळाडूंचे संपूर्ण क्रिकेट करियर संपुष्टात, थोड्याच कालावधीत संघातून बाहेरचा रस्ता.

0 0

 

 

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तरी आपल्या देशातून सर्वाधिक पसंती ही क्रिकेट खेळाला मिळत आहे. आपल्या देशात अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांना महेंद्रसिंह धोनी मुळे भारतीय संघात जास्त काळ खेळता आले नाही जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

 

महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचे माजी कर्णधार तसेच एक अनुभवी खेळाडू आहेत. भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीच्या अनुभवाचा मोठा फायदा झाला आहे. तसेच धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने तिन्ही आयसीसी ट्रॉफी आपल्या संघाला जिंकून दिल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 स्टंपिंग करणारा धोनी हा जगातील एकमेव विकेटकीपर आहे. परंतु महेंद्रसिंग धोनी मुळे अनेक खेळाडूंचे करियर सुरू होण्याआधीच संपले होते.

 

 

गौतम गंभीर:-

भारतीय संघाचे माजी फलंदाज गौतम गंभीर महेंद्रसिंग धोनीचा सिनियर फलंदाज आहे. परंतु महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार असल्यामुळे संघात धोनी ला जास्त महत्व होते. शिवाय धोनी आणि गौतम गंभीर यांमध्ये सतत वाद निर्माण व्हायचे. त्यामुळे 2013 साली धोनी ने गौतम गंभीर ला बाहेर करून रोहित शर्मा ला संधी दिली.

 

दीप दास गुप्ता:-

बंगालचा यष्टिरक्षक फलंदाज दीपदास गुप्ता च्या क्रिकेट करियर बद्दल सांगायचे झाले तर दीप दास ने फक्त पाच वनडे आणि आठ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांचा जन्म 07 जून 1977 रोजी पूर्णिया, बिहार येथे झाला. दीपदासची कारकीर्द केवळ एक वर्षाची होती. परंतु संघामध्ये धोनीची निवड झाल्यामुळे यांना संघात खेळण्याची संधी मिळाली नाही त्यामुळं दीप दास गुप्ता यांच्या करियर ला पूर्ण विराम लागला.

 

 

पार्थिव पटेल:-

पार्थिव पटेल भारतीय संघाचे अनुभवी विकेटकीपर फलंदाज होते. पार्थिव पटेल ने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी धोनीच्या आधी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. पार्थिव पटेल अजूनही क्रिकेट खेळत आहे. 16 वर्षांच्या कारकिर्दीत तो केवळ 25 कसोटी खेळला आहे. परंतु नंतर धोनी ने भारतीय संघात एन्ट्री केल्यावर पार्थिव पटेल ला बाहेर बसावे लागले. खेळातील आणि संघातील अनियमित पणामुळे पार्थिव पटेल चे क्रिकेट करियर संपुस्थात आले.

 

नमन ओझा:-

नमन ओझा चा तजन्म 20 जुलै 1983 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. नमन ओझा हा भारताचा सर्वात दुर्दैवी यष्टीरक्षक फलंदाज ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खरोखर सातत्यपूर्ण कामगिरी होती परंतु धोनी मुळे नमन ओझा ला एक ही संधी न मिळाल्यामुळे नमन ओझा ची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. जेव्हा जेव्हा मैदानावर धोनी ची उपस्थिती राहिली तेव्हा तेव्हा अनेक खेळाडूंना बाहेर बसावं लागयच यामध्ये अनेक जणांचे क्रिकेट करियर संपले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.