- Advertisement -

“ऐसे कोण मारता है भाई?” डूप्लेसी-विराटने मुंबईच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा, सोशल मिडीयावर मुंबईचा संघ होतोय जोरदार ट्रोल, लोकांनी शेअर केलेत भन्नाट मिम्स..

0 2

“ऐसे कोण मारता है भाई?” डूप्लेसी-विराटने मुंबईच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा, सोशल मिडीयावर मुंबईचा संघ होतोय जोरदार ट्रोल, लोकांनी शेअर केलेत भन्नाट मिम्स..


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पाचवा सामना खेळला गेला. या सामन्यात बंगळुरू संघाने कॅप्टन हिटमॅन अँड कंपनीचा 8 गडी राखून पराभव केला. मुंबईच्या या पराभवात विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसचा मोठा वाटा आहे. दोन्ही धडाकेबाज खेळाडूंनी मैदानात येऊन मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला..

मुंबई इंडियन्स

कोहली आणि फॅफनेही स्फोटक शैलीत फलंदाजी करताना आपली अर्धशतके पूर्ण केली. बंगळुरूच्या या विजयानंतर सोशल मीडियावर चाहते या दोन दिग्गज खेळाडूंच्या नावाचे जोरदार जप करत आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ ट्विटरवर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

विराट

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकात 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा पाठलाग करताना किंग कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या शानदार फलंदाजीने ते सहज साध्य केले. या दोन्ही खेळाडूंनी जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरडॉर्फयांची जोरदार धुलाई केली.

तर कोहली आणि फॅफने मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. मुंबईचे गोलंदाज त्याची विकेट घेण्यासाठी झटताना दिसले. दरम्यान, आयपीएलमधील पहिल्या पराभवानंतर मुंबईला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मीम्सच्या माध्यमातून चाहते रोहित शर्मा आणि कंपनीची खिल्ली उडवत आहेत.

मुंबईचा संघ होतोय सोशल मिडीयावर ट्रोल, पहा भन्नाट मिम्स..

 


हेही वाचा:

IPL 2023 मध्ये CSK या 4 खेळाडूंच्या मदतीने मोठा खेळू शकते, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

Leave A Reply

Your email address will not be published.