भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात असा काही प्रकार घडला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. काही क्रिकेट चाहते यशस्वी ठरतात, तर काहींना अपयश येते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. ज्यावेळी भारतीय संघातील खेळाडू हर्डल करून उभे होते, त्याचवेळी एका चाहत्याने मैदानाच्या दिशेने धाव घेतली.
शमीने केला बचाव..
मैदानात घुसलेल्या चाहत्याला बाहेर करण्यासाठी सेक्युरीटी गार्ड्सने धाव घेतली. त्याला पकडल्यानंतर सेक्युरीटी गार्ड्स त्या चाहत्याला धक्काबुक्की करत बाहेर घेऊन जात होते. त्याचवेळी मोहम्मद शमी मध्ये आला आणि त्याला धक्काबुक्की करत नेऊ नका असा सल्ला दिला.
The guard thrashed the fan who entered the ground, then Shami showed his big heart#Shami #CricketTwitter #Cricket #INDvsAUS #BGT2023 #2ndTest pic.twitter.com/p8fhAgzd0h
— Sports Nest (@sportsnestbuzz) February 17, 2023
या सामन्यातील पहिल्या डावात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने या डावात ४ गडी बाद केले. या अप्रतिम कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २६३ धावांवर संपुष्टात आला.