क्रिकेटर ‘मोहम्मद शमी’ला मोठा धक्का…! बायकोविरोधातील केसचा निकाल शमी विरोधात.. आता पत्नीला दरमहा एवढी रक्कम ‘पोटगी’ म्हणून द्यावी लागणार ..
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे राहणाऱ्या हसीन जहाँने तिचा पती भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरुद्ध सुरू असलेली कायदेशीर लढाई जिंकली आहे. कोलकात्याच्या अलीपूर कोर्टाने हसीन जहाँच्या बाजूने सुनावणी करताना मोहम्मद शमीला सूचना दिल्या आहेत.
न्यायालयाने भारतीय क्रिकेटपटूला (मोहम्मद शमी) निर्देश देताना सांगितले की, तो पत्नी आणि मुलीच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा एक लाख 30 हजार रुपये देईल. न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की, या रकमेपैकी 50 हजार रुपये त्याची पत्नी हसीन जहाँला आणि उर्वरित 80 हजार रुपये त्याच्या मुलीला दिले जातील.
2018 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा घेतला होता निर्णय..
हसीन आणि शमीच्या नात्यात 2018 मध्ये दुरावा आला, त्यानंतर दोघे वेगळे झाले. हसीन तिच्या मुलीसोबत कोलकात्यात एका फ्लॅटमध्ये राहू लागली. त्यावेळी हसीनने शमीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. पोटगीसाठी त्याने कोर्टात अर्जही दाखल केला होता आणि पोटगीसाठी शमीकडे 7 लाख रुपयांची मागणीही केली होती.
5 वर्षे न्यायालयात सुनावणी होती सुरू .
हसीन जहाँच्या या अर्जावर गेल्या ५ वर्षांपासून सुनावणी सुरू होती. हसीन जहाँने कोर्टात दाखल केलेल्या अर्जादरम्यान, मोहम्मद शमीने हसीन जहाँ विरोधात केस देखील दाखल केली आणि कोर्टाला सांगितले की हसीन जहाँ एक मॉडेल आहे आणि ती अभिनय देखील करते, ज्यामुळे तिला दरमहा 10 लाख रुपये मिळतात. शमीने आपली केस मजबूत करण्यासाठी वृत्तपत्रांच्या प्रती न्यायालयाला पुरवल्या होत्या. परंतु, हसीन जहाँच्या उत्पन्नाशी संबंधित कोणतेही वैध कागदपत्र ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत.
हे ही वाचा..
धोनी अन् विराटला मागे सोडत रोहित शर्मा ठरलाय ‘बॉस’, ‘या’ बाबती केलाय वर्ल्ड रेकॉर्ड!
अखेर केएल राहुल झाला शेट्टी कुटुंबाचा जावई! लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल