भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी आपल्या देशात सर्वात जास्त लोक क्रिकेट खेळाचे फॅन आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे सर्वाधिक आहे. क्रिकेट क्षेत्रात आपल्या देशाने मोठे स्थान प्राप्त केले आहे.
आपल्या देशात असे अनेक खेळाडू आहेत जे जगप्रसिद्ध आहेत यामध्ये सचिन तेंडुलकर सुरेश रैना जडेजा महेंद्रसिंह धोनी कपिल देव असे अनेक दिग्गज खेळाडू आपल्या देशात आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या भारतीय खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत तर जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.

सचिन तेंडुलकर
या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने 1989 ते 2013 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी 664 सामने खेळले. यादरम्यान सचिन तेंडुलकर ने 100 शतके पूर्ण केली होती. आणि एक क्रिकेट इतिहासात नवीन विक्रम केला.
राहुल द्रविड
भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड आहे. राहुल द्रविड 1996 ते 2007 या दरम्यान भारतीय संघासाठी क्रिकेट खेळला. दरम्यान राहुल द्रविड ने देशासाठी 509 आंतररा्ट्रीय सामने खेळले आहेत.
विराट कोहली:-
भारतीय संघाचा सर्वोत्तम आणि आक्रमक फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, विराट कोहली 2008 सालापासून भारतीय संघासाठी क्रिकेट खेळत आहे आणि त्याने आतापर्यंत 457 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
मोहम्मद अझरुद्दीन:-
या यादीत माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन पाचव्या स्थानावर आहे. मोहम्मद ने 1984 मध्ये भारतातून आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली आणि अनेक वर्षे क्रिकेट खेळले. मोहम्मद ने भारतीय संघासाठी 433 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.