आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा अव्वल गोलंदाज, रोहित शर्माचा सर्वात विश्वासू खेळाडू पहिल्या क्रमांकावर.

आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात. यामध्ये कब्बडी कुस्ती खो खो हॉकी असे असंख्य खेळ खेळले जातात परंतु आपल्या देशात सर्वात जास्त लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात. आणि खेळतात सुद्धा.
सध्या येत्या काही दिवसातच आयपीएल सुरू होईल. याच्या अपेक्षेवर असंख्य खेळाडू वाट पाहत आहेत. आयपीएल मध्ये अनेक खेळाडूंच्या नावी वेगवेगळी रेकॉर्ड आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी आयपीएल मध्ये सर्वात जास्त नो बॉल टाकले आहेत.

जसप्रीत बुमराह:-
आयपीएल मध्ये सर्वात जास्त नो बॉल टाकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जसप्रीत बुमराह चे नाव पहिल्या स्थानावर आहे . बुमराह च्या नावी आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम आहे, जो कोणत्याही गोलंदाजाला हा रेकॉर्ड ब्रेक करायला आवडणार नाही. जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या संघाकडून १०६ सामने खेळले आहेत. या सामन्या दरम्यान त्याने एकूण 27 नो बॉल टाकले आहेत. आणि लज्जास्पद रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे.
एस श्रीशांत:-
एस श्रीशांत हा भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आहे, ज्याने काही काळापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. श्रीशांतला आयपीएलमध्ये केवळ 44 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. आणि या 44 सामन्यांमध्ये श्रीशांत ने 23 नो बॉल टाकले.
अमित मिश्रा:-
अमित मिश्रा हा भारताचा अनुभवी गोलंदाज आहे, त्याने आयपीएलमध्ये एकूण 154 सामने खेळले आहेत. तसेच या 154 सामन्यात अमित मिश्राने २१ नो बॉल सुद्धा टाकले आहेत.
इशांत शर्मा:-
गेल्या वर्षीपासून ईशांत शर्मा आयपीएल मध्ये खेळताना आपल्याला दिसला नाही कारण त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतलेले नाही. आयपीएलमध्ये त्याने 93 सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने 18 नो बॉल टाकले आहे.