- Advertisement -

IPL 2023: मुंबई इंडियन्समध्ये बुमराह ची जागा घेणार हे खेळाडू, जाणून घ्या मुंबई इंडियन्स संघाचे 11 संभाव्य खेळाडू.

0 12

 

 

 

 

सध्या आयपीएल चा 16 वा सिझन सुरू होणार असल्यामुळे तरुण वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे कारण आपल्या देशात सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे दिवाणे आहेत अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे.

 

तसेच यंदा च्या आयपीएल सिझन चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघामध्ये होणार आहे तसेच दुसरा सामना हा 5 वेळा आयपीएल ट्रॉफी विजयी होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन्ही संघामध्ये होणार आहे.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे मुंबई इंडियन्स संघातील बुमाराह च्या जागी खेळू शकतात.

 

 

ओपनर जोडी:-

मुंबई इंडियन्स संघाची ओपनर जोडी ही इशान किशन आणि रोहित शर्मा ही असणार आहे.तसेच अनेक वर्षापासून मुंबई इंडियन्स हा संघ या दोन्ही खेळाडूंना ओपनिंग साठी पाठवतो.

 

 

मिडल ऑर्डर:-

मिडल ऑर्डर बद्दल सांगायचे झाले तर डेवाल्ड ब्रेविसला तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर आणि तिलक वर्माला पाचव्या क्रमांकावर खेळवले जाणार आहे.

 

अष्टपैलू खेळाडू:-

 

मुंबई इंडियन्स संघात 2 अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. सामन्यादरम्यान सहाव्या क्रमांकावर कॅमेरून ग्रीन आणि सातव्या क्रमांकावर अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच अर्जुन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आहे.

 

 

मुंबई इंडियन चे संभाव्य खेळाडू:-

 

मुंबई इंडियन संघात रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, शम्स मुलानी, जेसन बेहरेनडॉर्फ या खेळाडूंचा समावेश असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.