मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग या संघातील फॅन्स ने लावली ही खतरनाक पैज,मुंबई हरली तर चाहत्यांना करावी लागणार ‘ही’ गोष्ट

आपल्या देशातील तरुणांना क्रिकेट चे वेड हे मोठ्या प्रमाणात आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकजन आयपीएल कधी सुरू होतेय याची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच आयपीएल सिझन मध्ये वेगवेगळे संघ असतात. प्रत्येक जण आपापल्या आवडत्या संघाला सपोर्ट करत असतो तर बऱ्याच वेळा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्या सामन्याच्या दरम्यान वाद सुद्धा झाले आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या पैजेबद्दल सांगणार आहेत जी पैज ही आजच्या होणाऱ्या आयपीएल सामन्यात म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या मध्ये लावली आहे, तर जाणून घेऊया काय आहे ती पैज.
दरवर्षी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघात आक्रमक सामना होतो, तसेच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही आयपीएल मधील सर्वात जबरदस्त संघ आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे तर चेन्नई सुपर किंग संघाने 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
हे संघ तर आक्रमक आहेतच परंतु या संघाचे फॅन्स सुद्धा खूप खतरनाक आहेत. प्रत्येक वर्षी प्रत्येक सामन्याला फॅन्स हा रा घालतात. तसेच वेगवेगळा पैजी सुद्धा या सामन्यादरम्यान लागतात.
याच वेळी सोशल मीडिया वर एक करार पत्र वायरल होताना दिसत आहे.हा करार मुंबई इंडियन्सचा चाहता अपूर्व माळवदकर आणि चेन्नई सुपरकिंगचे चाहते सौरभ जाधव व गणेश अग्रवाल यांच्यात झाला आहे. जर IPL २०२३ च्या ट्रॉफीवर मुंबईनं नाव कोरलं तर अपूर्व चेन्नई फॅन्स सौरभ आणि गणेशला पार्टी देईल. आणि चैन्नई जिंकली तर मुंबई फॅन अपूर्वला पार्टी मिळेल.
पण या करारामध्ये एक ट्विस्ट आहे. जी टीम हरेल त्याच्या फॅन्सनं जिंकणाऱ्या टीमला सपोर्ट करावा लागेल. म्हणजे मुंबई जिंकली तर यापूढे चेन्नई फॅन्स मुंबईला सपोर्ट करतील आणि चेन्नई जिंकली तर मुंबईचा चाहता सुपरकिंगला सपोर्ट करेल.