- Advertisement -

FINAL: मुंबई की दिल्ली? कोण होणार WPL 2023 चा पहिला विजेता, आज मुंबईसीच्या ब्रेबॉर्न स्टेडियम रंगणार अंतिम लढत, असे असतील दोन्ही संघ,तर या खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष..

0 3

मुंबई की दिल्ली? कोण होणार WPL 2023 चा पहिला विजेता, आज मुंबईसीच्या ब्रेबॉर्न स्टेडियम रंगणार अंतिम लढत, असे असतील दोन्ही संघ,तर या खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष..


महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians )आणि दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर(brabourne stadium) होणार आहे. हे स्टेडियम खूप जुने असून त्यावर अनेक सामने आयोजित करण्यात आले आहेत. अंतिम सामन्यात खेळपट्टी खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या सामन्यात एका बाजूला मेग लॅनिंग (Meg Lanning) च्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals)  आणि दुसऱ्या बाजूला हरमनप्रीत कौरच्या (Harmanprit Kour) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians  मैदानात उतरणार आहे. हा सामना ऐतिहासिक असणार आहे आणि जो संघ जिंकेल तो आपले नाव इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी लिहील.

मुंबई

ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी(brabourne stadium pitch Report) गोलंदाज किंवा फलंदाजावर कोण वर्चस्व गाजवेल?

ब्रेबॉर्न क्रिकेट(Crickt) स्टेडियमची खेळपट्टी चांगली आहे आणि फलंदाजीला अनुकूल आहे. पण खेळपट्टीवर खेळ जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी गोलंदाजांनाही मदत करेल आणि फिरकी गोलंदाजांनाही मदत करेल. येथे दुसऱ्यांदा फलंदाजी करणे हा संघासाठी चांगला निर्णय ठरू शकतो.

WPL 2023 MI vs DC: असे आहेत दोन्ही संघ.

मुंबई

दिल्ली कॅपिटल्स संघ: मेग लॅनिंग (क), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, एलिस कॅप्स, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तान्या भाटिया (w), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, जसिया अख्तर, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, मिन्नू मणी, अपर्णा मंडल, टीटा साधू, स्नेहा दीप्ती

मुंबई इंडियन्स संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (डब्ल्यू), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, हीदर ग्रॅहम, क्लोए ट्रायटन धारा गुर्जर, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला


हेही वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.