VIRAL VIDEO: ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाने आडवा पडून मारला सूर्यकुमार यादवपेक्षा खतरनाक षटकार, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..
आज ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग 2023 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या शानदार सामन्यात पर्थ स्कॉचर्स आणि ब्रिस्बेन हीट हे संघ आमनेसामने आहेत. यावेळी दोन्ही संघ विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी आपली ताकद दाखवत आहेत. अंतिम सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे.

बिग बॅश लीग 2023 च्या अंतिम सामन्यात, ब्रिस्बेन हीटचा कर्णधार जिमी पीअरसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात 12 षटकांचा खेळ होईपर्यंत ब्रिस्बेनच्या संघाने 104 धावा केल्या आहेत. मॅकस्विनी 38 धावांवर, तर जिमी पीअरसन 3 धावा करून खेळत आहे.
नॅथन मॅकस्वीनीने सूर्यासारखा षटकार ठोकला.
नॅथन मॅकस्वीनीने नाबाद 38 धावा करताना यष्टिरक्षकावर शानदार षटकार ठोकला. त्याने हे शॉट्स टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवच्या शैलीत खेळले, त्याने ऑफ-स्टंपवर जाऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे यष्टिरक्षकाच्या अंतिम टप्प्याकडे पाठवला. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मॅकस्विनीने मारला हा षटकार, पाहा व्हिडिओ..
Ramped – for six! Good thinking from Nathan McSweeney #BBL12 pic.twitter.com/yfSucF4mcZ
— cricket.com.au (@cricketcomau) February 4, 2023
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
पर्थ स्कॉचर्स (प्लेइंग इलेव्हन): स्टीफन एस्किनाझी, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, आरोन हार्डी, जोश इंग्लिस (डब्ल्यू), अॅश्टन टर्नर (क), निक हॉबसन, कूपर कोनोली, अँड्र्यू टाय, डेव्हिड पायने, जेसन बेहरेनडॉर्फ, मॅथ्यू केली
ब्रिस्बेन हीट (प्लेइंग इलेव्हन): सॅम हेझलेट, जोश ब्राउन, नॅथन मॅकस्वीनी, सॅम हॅन, जिमी पीअरसन (सी/सी), मॅक्स ब्रायंट, मायकेल नेसर, जेम्स बॅझले, झेवियर बार्टलेट, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुहनमन
ते तीन भारतीय फलंदाज ज्यांना जगातील कोणताच गोलंदाज बाद करू शकला नाही, हा खेळाडू तर सलग 5 वेळा