सचिन तेंडूलकरने नाही तर या खेळाडूने झळकावले होते वनडेमधले पहिले ‘द्विशतक’, विक्रम मोडायला तेंडुलकरला लागली १३ वर्षे…

सचिन तेंडूलकरने नाही तर या खेळाडूने झळकावले होते वनडेमधले पहिले ‘द्विशतक’, विक्रम मोडायला तेंडुलकरला लागली १३ वर्षे…
टीम इंडियाचा माजी खेळाडू,क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने(sachin tendulkar )आपल्या फलंदाजीने जगभरातील क्रिकेटमध्ये विशेष असे नाव कमावले आहे. क्रिकेट विश्वात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. यादरम्यान त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
पण जेव्हा पहिल्यांदा द्विशतक झळकावण्याचा विचार येतो, तेव्हा मास्टर ब्लास्टरचे नाव सर्वप्रथम लोकांच्या मनात येते. पण तसं नाही, जर तुमचाही असा विचार असेल तर तुम्ही आजूनही भ्रमात आहात..
तुमच्या माहिती साठी क्रिकेटमधे पहिले द्विशतक सचिन तेंडूलकरने ठोकले असं वाटत असले तरीही असं नाहीये. द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू हा सचिन नसून दुसरा कोणीतरी आहे. आजच्या या विशेष लेखामध्ये आम्ही तुम्हाला त्याच खेळाडूबद्दल माहिती देणार आहोत. तेही अगदी सविस्तर.. चला तर मग सुरवात करूया आजच्या या लेखाला..

सचिन तेंडुलकर नाही तर या खेळाडूने झळकावले क्रिकेटमधील पहिले द्विशतक..!
द्विशतकाबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम कायम आहे की, क्रिकेट विश्वात कोणत्या खेळाडूने द्विशतक झळकावले? या प्रश्नाच्या उत्तरात बहुतेक चाहत्यांकडून सचिन तेंडुलकरचे नाव ऐकायला मिळेल. जरी हे पूर्णपणे बरोबर नाही कारण सचिनने पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील पहिले द्विशतक झळकावले होते. मात्र क्रिकेटच्य इतिहासातील सर्वांत पहिले द्विशतक करणारा तो पहिला खेळाडू नव्हता. त्याआधी, ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर बेलिंडा क्लार्कने (Belinda Clark) 1997 मध्येच वनडे इतिहासातील पहिले द्विशतक झळकावून हा विक्रम केला होता. हा विक्रम मोडायला सचिनला तब्बल १३ वर्षे लागली. 24 फेब्रुवारी 2010 रोजी सचिनने 200 चा आकडा गाठण्याचा पराक्रम केला होता.
बेलिंडाशिवाय या महिला क्रिकेटपटूने द्विशतक झळकावले होते.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर बेलिंडा क्लार्क 1997 मध्ये द्विशतक झळकावणारी पहिली महिला खेळाडू ठरली. डेन्मार्क विरुद्धच्या या सामन्यात बेलिंडाने 155 चेंडूंचा सामना केला ज्यात त्याने 22 चौकारांच्या मदतीने 229 धावांची नाबाद खेळी खेळली.
त्यानंतर न्यूझीलंडच्या अमेलिया केरने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध 145 चेंडूत नाबाद 232 धावांची खेळी केली होती. ही कामगिरी करणारी ती दुसरी महिला खेळाडू ठरली. भारताच्या दीप्ती शर्माने 2017 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 188 धावांची इनिंग खेळली होती.
या सामन्याची चर्चा मात्र सध्या सगळीकडे रंगतेय. https://mahabreakingnews.com/
हेही वाचा:
व्हिडीओ प्लेलीस्ट:
https://youtu.be/treU6AddvMI