NZ vs PAK: दुखापतीमधून सावरत केन विल्यमसनचा मोठा धमाका, न्यूझीलंड संघासाठी केली अशी कामगिरी…

 NZ vs PAK केन विल्यमसन

 NZ vs PAK:  भारतात सुरु असलेल्या एकदिवशीय विश्वचषकात (odi world cup 2023) आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड ( NZ vs PAK) यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने पुनरागमन केले आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करताच केन विल्यमसनने मोठी कामगिरी करत एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे.

Kane Williamson set to miss World Cup | RNZ News

 NZ vs PAK:  दुखापतीमधून सावरत केन विल्यमसनची मोठी कामगिरी.

केन विल्यमसन या सामन्यात चांगली फलंदाजी करत आहे. सध्या वृत्त लिहिपर्यंत विल्यमसन ३० धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. या सामन्यात 11 धावा करत विल्यमसनने विश्वचषकाच्या इतिहासातील 1000 धावा पूर्ण केल्या. विश्वचषकात १००० धावा पूर्ण करणारा केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचा तिसरा फलंदाज ठरला आहे. विल्यमसनने सर्वात जलद 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. केनने 25 सामन्यांच्या 24 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करणारे किवी फलंदाज

1. केन विल्यमसन (24 डावात 1000 धावा)

2. रॉस टेलर (30 डावात 1000 धावा)

3. स्टीफन फ्लेमिंग (32 डावात 1000 धावा)

 NZ vs PAK केन विल्यमसन

या विश्वचषक स्पर्धेत केन विल्यमसनला स्पर्धेतील सुरुवातीचे सामने खेळताना दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याला दोन सामन्यांतून बाहेर बसावे लागले. केनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आता त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्याने किवी संघाला खूप बळ मिळेल.

विल्यमसनच्या अनुपस्थितीत संघाची कमान यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथमकडे होती. या विश्वचषकातही विल्यमसन दुखापतीनंतरच परतला होता.  याआधी आयपीएल 2023 (ipl 2023)दरम्यान तो जखमी झाला, त्यानंतर त्याला संपूर्ण आयपीएलमधूनही बाहेर व्हावे लागले. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्स संघाकडून खेळत होता.


हेही वाचा: