ODI World Cup 2023 NZ vs PAK: रचीन रवींद्रने विश्वचषकात रचला इतिहास,48 वर्षात कुणीही करू शकला नव्हता अशी कामगिरी..

ODI World Cup 2023 NZ vs PAK: रचीन रवींद्रने विश्वचषकात रचला इतिहास,48 वर्षात कुणीही करू शकला नव्हता अशी कामगिरी..

ODI World Cup 2023 NZ vs PAK: एकदिवसीय विश्वचषक (odi world cup) स्पर्धेत रचिन रवींद्रची चमकदार कामगिरी सुरूच आहे. रचिनचा हा पहिलाच विश्वचषक असून पदार्पणाच्या विश्वचषकातच रचिन एकामागून एक विक्रम करत आहे. आज पुन्हा पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रचीनच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले. त्याचे हे स्पर्धेतील तिसरे शतक आहे. या शतकासह रचिनने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. न्यूझीलंडसाठी आजपर्यंत कुठलाही फलंदाज जे करू शकला नाही, ते रचिनने आपल्या पहिल्याच विश्वचषकात करून दाखवले.

ODI World Cup 2023 NZ vs PAK: एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला न्यूझीलंडचा फलंदाज ठरला रचिन रवींद्र..

 

आत्तापर्यंत रचिन रवींद्रने वर्ल्ड कप 2023 मध्ये तीन शतके झळकावली आहेत. त्याचे हे तिसरे शतक ठरले. यासह रचिन विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक शतके झळकावणारा पहिला किवी फलंदाज ठरला आहे. किवी संघाच्या एकाही फलंदाजाला 48 वर्षांपासून ही कामगिरी करता आली नव्हती. रचिनने आतापर्यंतचा विश्वचषक शानदार खेळला आहे. तो आपल्या संघासाठी सतत धावा करत आहे.

ODI World Cup 2023 NZ vs PAK: रचीन रवींद्रने विश्वचषकात रचला इतिहास,48 वर्षात कुणीही करू शकला नव्हता अशी कामगिरी..

विश्वचषकाच्या एका आवृतीत सर्वाधिक शतक ठोकणारे किवी फलंदाज

1. रचिन रवींद्र (3 शतके वर्ष 2023)

2. ग्लेन टर्नर (2 शतके, 1975)

3. केन विल्यमसन (2 शतके 2019)

4. मार्टिन गुप्टिल (2015 मध्ये 2 शतके)

रचिन रवींद्र पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने सुरुवातीपासूनच पाकिस्तानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या सामन्यात रचिनने 94 चेंडूत 108 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान रचिनने 15 चौकार आणि एक शानदार षटकार लगावला. या विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा रचिन आहे. आता त्याच्या नावावर 7 सामन्यात 415 धावा आहेत.


हेही वाचा: