आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी आपल्या देशात क्रिकेट खेळ लोकप्रिय आहे.आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच क्रिकेट चे वेड आहे हे आपल्याला माहीतच आहे.

आजपर्यंत क्रिकेट च्या इतिहासात अनेक खेळाडूंनी वेगवेगळी रेकॉर्ड बनवून क्रिकेट इतिहासात आपले नाव आणि रेकॉर्ड कोरून ठेवली आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे कसोटी क्रिकेट मध्ये एकाच दिवसा 2 वेळा बाद झाले आहेत.
बाबीची साल:-
1985 साली सिडनी येथे झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन गोलंदाज सी टर्नरने फलंदाज बॉबी पीलला सामन्याच्या एकाच दिवशी दोनदा आऊट केले होते.
टी वॉर्ड:-
1912 साली मँचेस्टर कसोटीदरम्यान टीजे मॅथ्यूजने एकाच दिवशी दोनदा फलंदाज टी वॉर्ड ला आऊट केले होते.
पंकज राय:-
1952 साली मँचेस्टर येथे झालेल्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात ट्रूमैन ने दोनदा पंकज रायची विकेट घेतली होती.
अॅन हार्वे:-
1956 मध्ये झालेल्या मँचेस्टर येथील कसोटी सामन्यात जिम लेकरने अॅन हार्वेची एकाच दिवसात दोनदा शिकार केली होती.
सी एमपोफू:-
2005 मध्ये हरारे येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात डॅनियल व्हिटोरीने एकाच दिवशी दोनदा सी मपोफूची विकेट घेतली होती.
सुरंगा लकमल
भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने 2022 मध्ये मोहाली कसोटीत एकाच दिवसात सुरंगा लकमलला 2 वेळा बाद केले.