पाकिस्तानला हरवल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने केले मन जिंकणारे वक्तव्य; म्हणाला, ‘मी ज्या दिवशी असा खेळणे…”

डेव्हिड वॉर्नर: ऑस्ट्रेलियाने आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानला हरवून दुसरा विजय नोंदवला आहे.  20 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या क्रमांक-18 सामन्यात पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकात 9 गडी गमावून 367 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

पाकिस्तानला हरवल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने केले मन जिंकणारे वक्तव्य; म्हणाला, 'मी ज्या दिवशी असा खेळणे..."

ऑस्ट्रोलियाकडून  डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतकी खेळी खेळली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण डाव केवळ ३०५ धावांवर आटोपला. वॉर्नरला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सामना संपल्यानंतर मुलाखतीदरम्यान तो काय म्हणाला ते जाणून घेऊया.

“मी नेहमी असाच खेळेन”-डेव्हिड वॉर्नर

 

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) विश्वचषक 2023 मध्ये एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी आलेल्या दोन्ही संघांनी हा सामना जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली. मात्र, शेवटी कांगारू संघाने बाजी मारली. हा सामना खूपच स्फोटक होता. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. नंतर अॅडम झाम्पा आणि मार्कस स्टॉइनिस यांनी आपल्या गोलंदाजीने सामना संपवला. 124 चेंडूत 14 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 163 धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर म्हणाला,

 

एकदा आम्हाला विकेटचा वेग आला की ,आम्ही त्यांच्या गोलंदाजांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू लागलो. तिथे जाऊन अशी कामगिरी करणे आमच्यासाठी खूप आनंददायी आहे. मी काल नेटमध्ये चांगली फटकेबाजी केली.  संघासाठी एवढी खेळी करू शकलो याचा आनंद आहे.

“अशा मैदानावर खेळताना तुम्हाला त्या संधींचा फायदा घ्यावा लागेल. आम्ही कमीतकमी 35 षटके फलंदाजी करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल बोललो आणि नंतर शक्यतो शेवटी जोरदार धावा केल्या. आमच्या दृष्टिकोनातून, आम्हाला काही बदल करावे लागतील, आम्ही शेवटच्या 10 मध्ये 5 किंवा 6 विकेट गमावल्या आहेत. प्रत्येक धाव मौल्यवान आहे, माझ्या डीएनएचा एक भाग म्हणजे विकेट्स दरम्यान कठोर परिश्रम करणे, मी नेहमीच ते केले आहे आणि जोपर्यंत मी खेळत राहीन तोपर्यंत मी तेच करत राहीन.”

Photos: एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये क्रिकेटर ब्रेंडन मॅक्क्युलमची पत्नी, फोटो पाहून सौंदर्य पाहतच बसाल..

डेव्हिड वॉर्नर च्या या वक्तव्याने नक्कीच संघाचे मनोबल वाढले असून क्रिकेट चाहतेही त्याच्या डेडीकेशनचे कौतुक करत आहेत. ऑस्ट्रोलियाने या विश्वचषकामध्ये सुरवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत सलग २ सामने जिंकले आहेत. आता त्यांचा प्रवास कुठपर्यंत पोहचतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा: