PAK vs AUS : मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम भडकला, या खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर.

PAK vs AUS : एकदिवसीय विश्वचषकात (Odi World Cup 2023) पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाकडून स्पर्धेतील दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (PAK vs AUS) सामन्यात पाकिस्तान संघाने आपल्या खराब कामगिरीने चाहत्यांची निराशा केली.

या सामन्यात कांगारू संघाच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा जोरदार पराभव केला. हा सामना गमावल्यानंतर पाकिस्तान संघाला गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे, आता पाकिस्तानचा संघ टॉप-4 मधून बाहेर पडला आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ टॉप-4 मध्ये पोहोचला आहे. कांगारू संघाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या बाबर आझमने आश्चर्यकारक विधान केले असून पराभवाचे खरे कारण सांगितले आहे.

AUS vs PAK

PAK vs AUS : पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम भडकला, या खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर.

Photos: एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये क्रिकेटर ब्रेंडन मॅक्क्युलमची पत्नी, फोटो पाहून सौंदर्य पाहतच बसाल..

सामन्यानंतर बोलताना पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) म्हणाला,

“आमची गोलंदाजी खूपच खराब होती, त्याशिवाय क्षेत्ररक्षण करताना आम्ही अनेक झेल सोडले. जर तुम्ही वॉर्नरसारख्या एखाद्या खेळाडूचा झेल सोडला तर, तो तुम्हाला सोडणार नाही.’ हे एक मोठे स्कोअरिंग ग्राउंड आहे, त्रुटीसाठी फारच कमी फरक आहे. मात्र, शेवटच्या काही षटकांमध्ये आम्ही ज्या प्रकारे सामन्यात परतलो, त्याचे संपूर्ण श्रेय वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना जाते. या सामन्यात जरी आम्ही लक्ष गाठून विजय नोंदवू शकलो नाही तरी पुढील सामन्यात आम्ही विजयश्री गाठण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करू.

पराभवानंतर अब्दुल्ला शफीक काय म्हणला?

पाकिस्तानकडून सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात केली पण सर्व फलंदाजांना ती राखता आली नाही. या सामन्यात सलामीवीर अब्दुल्ला शफीकने 61 चेंडूत 64 धावा केल्या आणि इमाम-उल-हकसोबत सलामीच्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. सामन्यानंतर बोलताना अब्दुल्ला शफीक म्हणाला,

“कॅचमुळे तुमचा खेळ नक्कीच बदलतो, तुम्हाला विकेट मिळतात आणि तुम्ही लयीत जाता. सर्व क्षेत्ररक्षक आपापली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतात, पण कधी कधी तुम्हाला ते मूल्य मिळत नाही. पण आम्ही चांगली लढत दिली आहे.” पुढील सामन्यात आम्ही नक्कीच पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू.

PAK vs AUS : मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम भडकला, या खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर.

PAK vs AUS:ऑस्ट्रेलियाने हा सामना 62 धावांनी जिंकला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 50 षटकात 367 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतके झळकावली. 368 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 45.3 षटकात 305 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने शानदार गोलंदाजी करत 4 बळी घेतले.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *