दक्षिण आफ्रिकेला 33 धावांनी पराभूत करून पाकिस्तानने सगळे गणित बिघडवलीत..!
आज टी-२० वर्ल्डकप चा ३६ वा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवला गेला. पावसामुळे थोडा वेळ थांबवल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर ३३ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच पाकिस्तानने आपल्या सेमीफायनल खेळण्याच्या उम्मीद जिवंत ठेवल्या आहे त तर दक्षिण आफ्रिकेसाठी अडचणी आणखी वाढल्या आहेत.
नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची कुटाई करत ९ विकेट गमावून १८५ धावा काढल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 186 धावांचे लक्ष ठेवले. लक्षाचा पाठलाग करतांना पावसामुळे सामना थांबवावा लागला. आणि नंतर डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर १४ ओव्हरमध्ये १४२ धावांचे लक्ष ठेवण्यात आले. अंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ ते लक्ष पार करू शकला नाही.

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले आणि पाकिस्तानकडून त्यांना तब्बल ३३ धावांनी पराभवाला सामोरी जावे लागले. या विजयासह पाकिस्तानने सेमीफायनल खेळण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पाकिस्तान आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर दाखल झाला आहे अस असले तरीही पाकिस्तानला आता पुढचे सर्व सामने जिंकून इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ या पराभवासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांना दोघानाही अनुक्रमे ४ आणि ५ पोईट आहेत. ज्यामुळे दक्षिण आफ्रिका दुसर्या स्थानावर कायम राहण्याची शक्यता जास्त आहे.
या दोन्ही संघांनी पुढील एक एक समान जिंकल्यास दक्षिण आफ्रिका एका गुणामुळे सेमीफायनल खेळेल आणि पाकिस्तान बाहेर पडेल. तर दुसरीकडे बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुद्धा तिसऱ्या क्रमाकांसाठी चांगलीच रेस आहे. नेटरनरेट कमी असल्यामुळे बांग्लादेशचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
एकंदरीत परिस्थिती पाहता दक्षिण आफ्रिका दुसर्या स्थानावर कायम राहून सेमी फायनल खेळण्याची शक्यता जास्त आहे. तर दुसरीकडे मात्र भारतीय संघ जवळपास सेमिफायनल मध्ये दाखल झाला आहे.दक्षिण आफ्रिका पुढचा सामना जिंकल्यास सहज सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.
बांग्लादेश आणि पाकिस्तान संघाना आता फक्त दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढच्या सामन्यात पाकिस्तान जिंकला आणि दक्षिण आफ्रिका हरली तर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण त्याबरोबरच बांग्लादेशसुद्धा त्यांचा पुढचा सामना हरणे गरजेचे आहे..
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..