सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान महिला संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तान महिला संघातील यष्टीरक्षकाने हास्यास्पद कृत्य केले आहे. याष्टिरक्षक मुनिबा अलीने एक सोपा रन आऊट सोडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी (२० जानेवारी) पार पडला. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षणाचा उल्लेख केला जातो, तेव्हा पाकिस्तान संघ नेहमीच मागे असतो. पुरुष संघातील खेळाडूंनी देखील सोपे झेल सोडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान पाकिस्तान महिला संघातील खेळाडूंनी देखील क्षेत्ररक्षण करण्याच्या बाबतीत पुरुष संघातील खेळाडूंची बरोबरी केली आहे.
https://twitter.com/7Cricket/status/1616640391553376256?t=ZPXSPLjTVxPQzQMDoTsYHA&s=19
तर झाले असे की, शेवटचे षटक सुरू असताना जेस जॉनसन आणि किम गार्थ फलंदाजी करत होते. गोलंदाज फातिमा सनाने टाकलेल्या चेंडूवर फलंदाज किम गार्थने डीफेंसिव शॉट मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यष्टिरक्षण करत असलेल्या मूनिबा अलीने चपळता दाखवत चेंडू थांबवला आणि तिला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र यष्टीच्या अगदी जवळ असताना देखील तिने चेंडू यष्टीला लावला नाही. त्यामुळे धावबाद करण्याची संधी हुकली.
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…