टी-20 विश्वचषक 2022
मध्ये गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आमना सामना झाला. पाकिस्तान संघासाठी हा सामना जिंकणे दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत अधिक महत्वाचे होते. महत्वाच्या लढतील पाकिस्तानने 33 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य सामन्याच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले. पाकिस्तानच्या विजयात इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी महत्वपूर्ण खेळी केली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या फलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये झटपट विकेट्स गमावल्या. पण नंतर इफ्तिखार अहमद () याने 51, तर शादाब खान () याने 52 धावांचे सर्वात मोठे योगदान दिले. पाकिस्तानने मर्यादित 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 185 धावा कुटल्या. परंतु प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य गाठू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एंगिडी () याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. लक्ष्याच पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. पाकिस्तानसाठी गोलंदाजांमध्ये शाहीन आफ्रिदी याने सर्वोत्तम प्रदर्शन करत तीन विकेट्स नावावर केल्या.