- Advertisement -

पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर, या दोन नवीन खेळाडूंना मिळणार संधी.

0 6

 

 

 

२६ एप्रिलपासून पाकिस्तान टीम विरुद्धसाठी पाच वनडे सामन्याच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने आपला संव्ह जाहीर केला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर न्युझलंड संघाचा कर्णधार हा टॉम लॅथम असणार आहे. पाकिस्तान देशात हे पाचदिवसीय वनडे मालिका चालणार आहे.

 

मात्र न्यूझीलंड संघातील असे अनेक खेळाडू आहेत जे या मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहेत कारण सध्या भारतामध्ये आयपीएल चा १६ हंगाम सुरू असल्यामुळे न्यूझीलंड चे खेळाडू आयपीएल खेळत आहेत. त्यामुळे पाकिस्तान मध्ये होणाऱ्या मालिकेत न्यूझीलंड चे काही खेळाडू दिसणार नाहीत.

 

केन विल्यम्सन ला दुखापत :-

 

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सनला दुखापत झाली असल्यामुळे तो सध्या आयपीएल २०२३ मधून बाहेर दिसत आहे. याव्यतिरिक्त टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रासवेल, मिचेल सँटनर आणि फिन ऍलन सुद्धा या मालिकेत दिसणार नाहीत. तर न्यूझलंड संघातील काही वरिष्ठ खेळाडू पाकिस्तान दौऱ्यातील मालिकेचा भाग दिसणार असल्याचे चर्चेत आले आहेत.

 

टॉम लॅथम असणार कर्णधार :-

 

सध्या न्यूजलंड चा कर्णधार टॉम लॅथम आहे जे की पाकिस्तान दौऱ्यावर सध्या टॉम ला डॅरिल मिशेल, मॅट हेन्री, जेम्स नीशम, हेन्री निकोल्स आणि ईश सोधी या एकदम अनुभवी खेळाडूंची साथ भेटणार आहे. एवढेच नाही तर न्यूझलंड संघात नवीन दोन खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. जे दोन खेळाडू पाकिस्तान मध्ये होणाऱ्या मालिकेत पदार्पण करणार आहेत. या दोन खेळाडूंची नावे बेन लिस्टर आणि कोल मॅककॉन आहेत. हा सामना २६ एप्रिल पासून रावळपिंडीत चालू होणार असल्याचे ५ दिवसीय वनडे सामना होणार आहे. तर शेवटचा वनडे सामना हा ७ मे ला होणार आहे. जो शेवटचा ७ मे चा सामना आहे तो कराची मध्ये खेळला जाणार आहे.

 

न्यूझीलंड एकदिवसीय संघ खालीलप्रमाणे आहे

 

टॉम लॅथम ( कर्णधार), चॅड बोवेस, टॉम ब्लंडेल, मॅट हेन्री, कोल मॅककॉनची, रचीन रवींद्र, अॅडम मिल्ने, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, विल यंग, हेन्री शिपले, जिमी निशम, ईश सोधी, ब्लेअर टिकनर हे सर्व खेळाडू पाकिस्तान दौऱ्यावर वनडे सामन्यासाठी दिसणार आहेत. जो की हा वनडे सामना २४ एप्रिल ते ७ मे कालावधी दरम्यान दिसणार आहे. या वनडे सामन्याचा शेवटचा दिवस ७ मी रोजी दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.