“ती एक महिला आहे, काहीही करू शकते”, पाकिस्तानी खेळाडू धावबाद करण्याऐवजी चेंडू घेऊन जमिनीवर झोपली, त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती.

“ती एक महिला आहे, काहीही करू शकते”, पाकिस्तानी खेळाडू धावबाद करण्याऐवजी चेंडू घेऊन जमिनीवर झोपली, त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती.
क्रिकेट हा जगातील 80 टक्के लोकांचा आवडता खेळ आहे. जगभरात क्रिकेट या खेळाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. क्रिकेट चे वेड हे प्रत्येक देशात आहे हे आपल्याला माहीतच आहे. क्रिकेट मद्ये करियर करायचे असेल तर सध्या च्या काळात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे मग ते महिला क्रिकेट असो वा पुरुष क्रिकेट.

क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी कोणत्याही खेळाडू चा फॉर्म चांगला असणे गरजेचे असते. जर आपला फॉर्म चांगला असेल तरच आपल्याला संघात टिकून राहता येते.
तर मित्रांनो सोशल मीडिया वर आपण अनेक क्रिकेट संबंधित वायरल झालेले व्हिडिओ आपण पाहत असतो. सोशल मीडियावर असे व्हिडिओ वायरल झालेले असतात जे की क्रिकेट मॅचेस दरम्यान झालेल्या चुका तसेच भांडणे आणि काही हास्यास्पद कृत्ये तसेच या प्रकारचे व्हिडिओ लोक आवडीने पाहत असतात. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात महीला क्रिकेट सामन्यादरमयान घडलेला एक किस्सा सांगणार आहोत.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट सामन्यात मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानी संघाची मुनीबा अली मेंदूच्या आहारी गेली. याआधीही क्रिकेटच्या मैदानावर अनेक ब्रेन फेड घटना पाहिल्या आहेत. आणि 21 जानेवारीला सामने खेळले गेले. त्यावेळी सुद्धा ब्रेन फेड मुळे विरोधी संघाला जीवनदान दिले.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघ यांच्या मध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली होती. या मालिकेतील शेवटचा सामना हा 21 जानेवारी म्हणजेच शनिवारी झाला होता. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 101 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 9 गडी गमावून 337 धावांचे लक्ष्य पाकिस्तानी संघापुढे ठेवले. या दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाच्या डावातील 49व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर किम गर्थला नश्रा संधूने त्रिफळाचीत केले.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅटचा चेंडूशी चांगला संपर्क झाला नाही आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. अशा परिस्थितीत मुनिबाकडे किमला धावबाद करण्यासाठी पुरेसा वेळ होता. परंतु ब्रेन फेड झाल्यामुळे रण आऊट करता आले नाही. यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला.