सध्या भारतीय संघाबाहेर असलेला पृथ्वी शॉचा एक नवा वाद समोर आला आहे. पृथ्वी शॉ आणि त्यांच्या मित्रांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. त्यामूळे पोलिसांनी पृथ्वी शॉसह असलेल्या सपना गिलला अटक केले आहे. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, यूट्यूबर सपना गिलला १७ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणात ओशिवरा पोलीस स्थानकात ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या लोकांवर पृथ्वी शॉवर हल्ला करण्याचा आणि त्याची कारची काच फोडण्याचा आरोप आहे. यावेळी पृथ्वी शॉ देखील तिथे उपस्थित होता. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी देखील केली गेली.
काय आहे नक्की प्रकरण…
पृथ्वी शॉ आणि काही लोकांमध्ये सेल्फीवरून वाद झाला. त्यानंतर ८ लोकांनी मिळून पृथ्वी शॉच्या मित्राच्या करवर हल्ला केला आणि त्याच्या कारची काच फोडली.
Prithvi Shaw is a great example of how to distroy your own career…
Viral videos on social media are so shameful for a young talent like him…
Not going to post that video and requesting the same to all. #PrithviShaw #PrithviShaw pic.twitter.com/Aofa6MLhLV
— Ram Charan 🏹🚩 (@nobuddy97421879) February 16, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ आपला मित्र आशिष आणि ब्रिजेशसह डिनर करण्यासाठी गेला होता. त्यावेळी सेल्फी घेण्यावरून पृथ्वी शॉ आणि काही लोकांमध्ये वाद झाला.
आशिषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही लोक पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्यासाठी आले. त्यावेळी पृथ्वीने त्यांच्यासोबत सेल्फी काढला. मात्र काही वेळानंतर पूर्ण ग्रुप सेल्फीसाठी आला. त्यावेळी शॉने सेल्फी काढण्यास नकार दिला. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. काही लोक बेसबॉल बॅट घेऊन उभे होते. त्यांनी कारचा पाठलाग करत कारची काच फोडली. एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये पृथ्वी शॉ एका मुलीकडून बेसबॉल बॅट खेचत असताना दिसून येत आहे.
हे ही वाचा..