6,0,6,4,,6,6: रणजी ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉ घालतोय धुमाकूळ,तब्बल 31 चौकार मारत ठोकले ताबडतोब दुहेरी शतक,टीम इंडियाच्या निवड समितीला चोख प्रतीउत्तर..
मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने मंगळवारी रणजी ट्रॉफीच्या एलिट गटातील सामन्यात आसामविरुद्ध अवघ्या 107 चेंडूत शतक झळकावून राष्ट्रीय निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पृथ्वी शॉने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 12वे शतक झळकावून मुंबईला लंचपर्यंत 171/1 पर्यंत नेले. त्यांनतर पुढे खेळत पृथ्वीने आपले दुहेरी शतक सुद्धा पूर्ण केले.
आपल्या या खेळीत त्याने 252 चेंडू खेळून 218 धावा काढल्या. ज्यात त्याने तब्बल 31 चौकार ठोकले. पृथ्वीच्या या ताबडतोब खेळीच्या जोरावर मुंबईने आसाम विरोधात 357 धावा काढल्या असून अजिंक्य राहणे आणि पृथ्वी आजून खेळपट्टीवर उभे आहेत.
त्याआधी पृथ्वी शॉने सध्याच्या रणजी ट्रॉफीमध्ये आपले पहिले शतक झळकावले आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ 107 चेंडू घेतले. यादरम्यान उजव्या हाताच्या फलंदाजाने 15 चौकार आणि 1 षटकार लगावला. शॉने केवळ धमाकेदार खेळीच खेळली नाही तर मुशीर खानसोबत १२३ धावांची शतकी भागीदारी करून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. आसामने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
पृथ्वी शॉ सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडचा सामना करणाऱ्या भारत अ संघाचा भाग होता. असे असतानाही पृथ्वी शॉची देशांतर्गत किंवा परदेश दौऱ्यावर कोणत्याही मालिकेत निवड झाली नाही. पृथ्वी शॉने जुलै 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता, जेव्हा तो श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा भाग होता. पृथ्वी शॉने काही काळापूर्वी सांगितले होते की तो सर्व निराशा मागे टाकून निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी कठोर परिश्रम करेन.
मिड-डेला पृथ्वी शॉ म्हणाला, “मी निराश झालो आहे. मी धावा करत आहे, मेहनत घेत आहे पण संधी मिळत नाही. पण ते ठीक आहे. जेव्हा राष्ट्रीय निवडकर्त्यांना वाटेल की मी तयार आहे, तेव्हा ते मला संधी देतील. मला जी काही संधी मिळेल, मी माझे सर्वोत्तम देईन आणि माझा फिटनेस उच्च पातळीवर राखेन.
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: