दिल्लीच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना आर अश्विनने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात अश्विनने अनोखं शतक झळकावलं आहे.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये रचाल इतिहास..
आर अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुध्द सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३ गडी बाद केले आहेत. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो केवळ दुसराच गोलंदाज ठरला आहे. या यादीत भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे पहिल्या स्थानी आहेत.
आर अश्विनपूर्वी हा विक्रम अनिल कुंबळेंनी केला होता. अनिल कुंबळे यांनी ऑस्ट्रेलिया विरुध्द कसोटी सामना खेळताना १११ गडी बाद केले आहेत. तर आर अश्विनने १०० गडी बाद केले आहेत. आर अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ९० कसोटी सामन्यांमध्ये ४६० गडी बाद केले आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुध्द सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज…
१) अनिल कुंबळे -१११ गडी
२) आर अश्विन – १०० गडी
३) हरभजन सिंग -९५ गडी