Ind vs NZ: अनेकदा संधी मिळूनही भारताचा ‘हा’ फलंदाज ठरतोय फ्लॉप! आता पुनरागमन करणं कठीण…

लखनऊच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून जोरदार विजय मिळवला. यासह ३ टी -२० सामन्यांची मालिका आता १-१ च्या बरोबरीत आली आहे. मात्र या सामन्यातील एक खेळाडू भारतीय संघासाठी खलनायक ठरला आहे. दुसऱ्या टी -२० सामन्यातही फ्लॉप ठरल्यामुळे या खेळाडूला लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
दुसऱ्या टी -२० सामन्यासह जवळजवळ संपुष्टात आली आहे या खेळाडूची कारकीर्द..
दुसऱ्या टी -२० सामन्यात या खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे क्रिकेट चाहते देखील या खेळाडूला संघाबाहेर करण्याची मागणी करू लागले आहेत. अनेकदा संधी मिळूनही हा खेळाडू संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात हार्दिक पंड्याने राहुल त्रिपाठीला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये संधी दिली होती. मात्र ही संधी देखील त्याने गमावली आहे.
भारतीय संघात पुनरागमन करणं कठीण..
न्यूझीलंड विरुध्द पार पडलेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. मात्र तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने या सामन्यात १८ चेंडूंचा सामना करत १३ धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला. पहिल्या सामन्यात तर तो खाते ही न उघडता माघारी परतला होता. असे असताना देखील त्याला दुसऱ्या सामन्यात संधी दिली गेली होती.

सलग २ सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर, तिसऱ्या सामन्यात राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, त्याची भारतीय संघातून कायमची सुट्टी होऊ शकते. तिसऱ्या टी -२० सामन्यात राहुल त्रिपाठी ऐवजी पृथ्वी शॉ ला संधी दिली जाऊ शकते.
हे ही वाचा..