Ranji Trophy 2025: दुहेरी शतक ठोकूनही सरफराज खानला मुंबई संघात जागा नाही, समोर आले मोठे कारण..

0
33
Ranji Trophy 2025: दुहेरी शतक ठोकूनही सरफराज खानला मुंबई संघात जागा नाही, समोर आले मोठे कारण..
ad

Ranji Trophy 2025: भारतीय फलंदाज सर्फराज खानने अलीकडेच इराणी चषक 2024 मध्ये द्विशतक झळकावून इतिहास रचला. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने इराणी ट्रॉफीवरही कब्जा केला. मात्र, आता सर्फराज खानला आगामी रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघातून वगळावे लागले आहे. त्याला पहिल्या सामन्यासाठी स्थान देण्यात आलेले नाही.

Ranji Trophy 2025: सर्फराज खान संघाबाहेर

 Irani Trophy 2024: भल्या भल्या दिग्गजांना जमल नाही ते सर्फराज खानने केलं , अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू..

मुंबई 11 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे, जिथे त्याचा सामना बडोद्याशी होणार आहे. यानंतर 18 ऑक्टोबरला मुंबईचा सामना महाराष्ट्राविरुद्ध होणार आहे. मात्र, पहिल्या दोन सामन्यांसाठी सर्फराज खानला मुंबईच्या संघात संधी मिळालेली नाही.

या कारणामुळे सरफराज खान रजनी ट्रॉफीमधून बाहेर

सर्फराज खानचा न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे. मुंबईचे पहिले दोन रणजी सामने भारत आणि न्यूझीलंड मालिकेशी जुळतात. अशा स्थितीत सर्फराज खानला मुंबई संघात स्थान देण्यात आलेले नाही. मुंबईने गेल्या रणजी मोसमात चमकदार कामगिरी करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते.

सरफराज खान इराणी ट्रॉफीमध्ये चमकला

अलीकडेच इराणी चषक (irani trophy 2024 ) स्पर्धेत मुंबईकडून खेळत असलेल्या सरफराजने भारताविरुद्ध दमदार द्विशतक झळकावले. सरफराजने पहिल्या डावात 222 धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे मुंबईने विजेतेपदही पटकावले.

बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सरफराज खानला संधी मिळाली. मात्र त्याला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले नाही. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत सरफराजला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Ranji Trophy 2025: दुहेरी शतक ठोकूनही सरफराज खानला मुंबई संघात जागा नाही, समोर आले मोठे कारण..

Ranji Trophy 2025: पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धांत अधातराव (यष्टीरक्षक), शम्स मुलाणी, तनुष कोटियान, हिमांशू सिंह, शरथ कुमार, शर्मिंद सिंह. , मो. जुनैद खान, रॉयस्टन डायस.


हेही वाचा: