सर जडेजा अंगार है…! 300+च्या स्पीडने येणारा चेंडू जडेजाने सहज घेतला झेल, पकडला नसता तर अंपायर झाला असता जखमी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
सर जडेजा अंगार है…! 300+च्या स्पीडने येणारा चेंडू जडेजाने सहज घेतला झेल, पकडला नसता तर अंपायर झाला असता जखमी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
आयपीएलमध्ये आज दोन बलाढ्य संघ आज मुंबईच्या मैदानात आमनेसामने आहेत. दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरू आहे. CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच मुंबईच्या फलंदाजावर दबाव आणला आहे.
पुन्हा एकदा रवींद्र जडेजाने मोठ्या सामन्यात आपली आगपाखड केली आहे. जडेजाने तीन विकेट घेतल्या आहेत. क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या सर जडेजाने अप्रतिम झेल घेतला. कॅमेरॉन ग्रीनला त्याच्याच बॉलवर कॅच घेऊन जडेजाने मुंबईचे कंबरडे मोडले आहे. ग्रीनने फॉरवर्ड बॉल गोलंदाजाच्या दिशेने जोरात मारला. मात्र जडेजाने त्याचा वेगवान चेंडू एका हाताने झेलला.

जडेजाने हा झेल पकडला नसता तर चेंडू अंपायरलाही लागू शकला असता.
रवींद्र जडेजाने 4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. नाणेफेक हरल्यानंतर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. मात्र रोहित बाद होताच संघ पुन्हा एकदा विस्कळीत झाला.
असे आहेत दोन्ही संघ:
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन):
रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन):
डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.
पहा जडेजाचा शानदार झेल.
Best fielder they said …. Well said 👏👏
RAVINDRA JADEJA is name, taking difficult catches is his game 🔥#jadeja | #WhistlePodu | #CSKvMI pic.twitter.com/dIijdcaqPm
— Abhi (@abhi_is_online) April 8, 2023