पहिल्या कसोटी सामन्यासाठी जडेजा फिट तर संघातील मुख्य फलंदाज दुखापतीमुळे बाहेर..
पहिल्या कसोटी सामन्यासाठी जडेजा फिट तर संघातील मुख्य फलंदाज दुखापतीमुळे बाहेर..
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट आणि चांगली बातमी समोर आली आहे. चांगली बातमी अशी की, भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून, तो लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. तर वाईट बातमी अशी की, श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.
श्रेयस अय्यर पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाल्याने, आता सूर्यकुमार यादवला कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. तर रवींद्र जडेजा बद्दल सांगायचं झालं तर, तो पूर्णपणे फिट असून पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळताना दिसून येणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामन्याला ९ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे.
गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे रवींद्र जडेजा आशिया चषक स्पर्धेतून बाहेर झाला होता. ज्यामुळे त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. याच कारणामुळे त्याला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतून देखील माघार घ्यावी लागली होती.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत जोरदार कामगिरी..
रवींद्र जडेजाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत पुनरागमन केले. त्याने सौराष्ट्र संघासाठी खेळताना चेन्नईच्या मैदानावर जोरदार कामगिरी केली. यादरम्यान त्याने ४१ षटके गोलंदाजी करत ७ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना त्याने २५ धावा केल्या.
हे ही वाचा…